पाली भाषेत :-

४८१ अञ्ञेन च केवलिनं महेसिं। खीणासवं कुक्कुच्चवूपसन्तं।
अन्नेन पानेन उपट्ठहस्सु। खेत्तं हि तं पुञ्ञऽपेक्खस्स होति।।२७।।

४८२ साधाहं भगवा तथा विजञ्ञं। यो दक्खिणं भुंजेय्य मादिसस्स।
यं यञ्ञकाले परियेसमानो। पप्पुय्य तव सासनं।।२८।।

४८३ सारम्भा यस्स विगता चित्तं यस्स अनाविलं।
विप्पमुत्तो च कामेहि थीनं यस्स पनूदितं।।२९।।

४८४ सीमन्तानं विनेतारं जातिमरणकोविदं।
मुनिं मोनेय्यसंपन्नं तादिसं यञ्ञमागतं।।३०।।

मराठीत अनुवाद :-

४८१. कैवल्य प्राप्त झालेल्या क्षीणपाप व कौकृत्य१ (१. ९२५ व्या गाथेंतील ह्या शब्दावरील टीप पहा.) शांत झालेल्या महर्षीची तूं अन्य अन्नपानानें सेवा कर. कां कीं, पुण्येच्छूला तो पुण्यक्षेत्रासारखा होय.(२७)

४८२. (ब्राह्मण-) हे भगवन्, मला आपल्या शासनाचा लाभ घडला आहे, तर आतां यज्ञकालीं, शोधूं गेलें असतां, माझ्या सारख्याची दक्षिणा घेण्यास योग्य होईल असा कोण, हें मला समजूं द्या.(२८)

४८३. (भगवान्-) ज्याच्या ठायीं विरोधप्रियता नाहीं, ज्याचें चित्त निर्मळ, जो कामोपभोगापासून मुक्त, ज्याचा अनुत्साह दूर झाला, (२९)

४८४. (आपपरभावाच्या) सीमा२ (२ टीकाकार ह्या शब्दाचें गूढार्थी विवरण करतो.) ज्यानें उल्लंघन केल्या, जो जन्ममरणज्ञानांत कुशल, व जो मौनसंपन्न, असा मुनि यज्ञाला आला असतां,(३०)

पाली भाषेत :-


४८५ भकुटिं विनयित्वान पंजलिका नमस्सथ।
पूजेथ अन्नपानेन एवं इज्झन्ति दक्खिणा।।३१।।

४८६ बुद्धो भवं अरहति पूरळासं। पुञ्ञक्खेत्तमनुत्तरं।
आयोगो सब्बलोकस्स। भोतो दिन्नं महप्फलं ति।।३२।।

अथ खो सुन्दरिकभारद्वाजो ब्राह्मणो भगवन्तं एतदवोच—अभिक्कन्तं भो गोतम...पे...अनेकपरियायेन धम्मो पकासितो। एसाहं भवन्तं गोतमं सरणं गच्छामि, धम्मं च भिक्खुसंघं च। लभेय्याहं भोतो गोतमस्स सन्तिके पब्बज्जं, लभेय्यं उपसंपदं ति। अलत्थ सुन्दरिकभारद्वाजो ब्राह्मणो...पे...अरहतं अहोसी ति।

सुन्दरिकभारद्वाजसुत्तं निट्ठितं।

मराठीत अनुवाद :-


४८५. भिंवया न चढवितां, हात जोडून त्याला नमस्कार करा, व अन्नपानानें त्याची पूजा करा. याप्रमाणें दिलेल्या दक्षिणा फलद्रूप होतात.(३१)

४८६. (ब्राह्मण-) लोकोत्तर, पुण्यक्षेत्र, सर्व लोकांना पूजनीय असा भवान् बुद्ध पुरोडाश देण्याला योग्य आहे; भगवन्ताला दिलेलें (दान) महत्फलदायक होतें.(३२)

त्यावर सुन्दरिक भारद्वाज ब्राह्मण भगवन्ताला म्हणाला, “धन्य! धन्य! भो गोतमा,...” [इत्यादिक कसिभारद्वाजसुत्ताच्या शेवटीं (पान२९-३०) पहा.]...आयुष्मान् सुन्दरिक भारद्वाज अरहत्तांपैकी एक झाला.

सुन्दरिकभारद्वाजसुत्त समाप्त
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel