पाली भाषेत :-

११०३ आदानतण्हं विनयेथ सब्बं (भद्रावुधा ति भगवा)। उद्धं अधो तिरियं १( १ सी.-, म.- वाऽपि. )चापि मज्झे।
यं यं हि लोकस्मिं२( २ म.- स्मि. ) उपादियन्ति। तेनेव मारो अन्वेति जन्तुं।।३।।

११०४ तस्मा पजानं न उपादियेथ। भिक्खु सतो किञ्चनं सब्बलोके।
आदानसत्ते इति पेक्खमानो। पजं इमं मच्चुधेय्ये३( ३ म.- धेय्य. ) विसत्तं ति।।४।।

भद्रावुधमाणवपुच्छा निट्ठिता।

मराठीत अनुवाद :-


११०३ सर्व प्रकारची आदानतृष्णा — हे भद्रावुधा, असें भगवान् म्हणाला — मग ती वर, खालीं, चौफेर किंवा मध्यें असो, तिचा नाश करावा. कारण, जगांत ज्या ज्या वस्तूचें प्राणी उपादान करतो, तिच्या तिच्या द्वारें मार त्याच्या मागें लागतो. (३)

११०४ म्हणून, हे लोक आदानांत आसक्त झालेले आणि मृत्युध्येयांत गुरफटलेले पाहून जाणत्या भिक्षूनें स्मृतिमान् होऊन सर्व जगांत कोणत्याही प्रकारचें उपादान करूं नये. (४)

भद्रावुधमाणवपुच्छा समाप्त

६८
[१४ उदयमाणवपुच्छा (१३)]

पाली भाषेत :-


११०५ झायिं विरजमासीनं (इच्चायस्मा उदयो) कतकिच्चं अनासवं।
पारगुं सब्बधम्मानं अत्थि पञ्हेन आगमं।
( १ म.-अञ्ञविमुक्खं, अञ्ञं. )अञ्ञाविमोक्ख पब्रूहि अविज्जाय पभेदनं।।१।।

११०६ पहानं कामच्छन्दानं२( २म.-कामछन्दानं ) (उदया ति भगवा) दोमनस्सान चूभयं।
थीनस्स३(३-३ सी., म.-थीनस्स ) च३ पनूदनं४(४ म., Fsb.-पनुदनं.) कुक्कुच्चानं निवारणं।।२।।

६८
[१४ उदयमाणवपुच्छा (१३)]

मराठीत अनुवाद :-

११०५ ध्यानरत, विमल, स्थिर — असें आयुष्मान् उदय म्हणाला — कृतकृत्य, अनाश्रव आणि जो सर्व धर्मांत पारंगत, अशापाशीं मी प्रश्न विचारण्याच्या इच्छेनें आलों आहें. अविद्येचा भेद करणारा व प्रज्ञेनें मिळणारा विमोक्ष कोणता तें सांग. (१)

११०६ कामच्छन्द आणि दौर्मनस्य — हे उदया, असें भगवान् म्हणाला — या उभयतांचा त्याग करणारा, आळसाचा नाश करणारा, कौकृत्यांचें१ (१. ९२५ व्या गाथेंतील ह्या शब्दांवरील टीप पहा.) निवारण करणारा, (२)
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel