पाली भाषेत :-

२७८ विनिपातं समापन्नो गब्भा गब्भं तमा तमं।
स वे तादिसको भिक्खु पेच्च दुक्खं निगच्छति।।५।।

२७९ गूथकूपो यथा अस्स संपुण्णो गणवस्सिको।
(१ सी., म.-यो च.)१यो एवरूपो अस्स दुब्बिसोधो हि संगणो२(म.-अंगणो.)।।६।।

२८० यं एवरूपं जानाथ भिक्खवो गेहनिस्सितं।
पापिच्छं पापसंकप्पं पापआचारगोचरं।।७।।

२८१ सब्बे समग्गा हुत्वान अभिनिब्बिज्ज२(२ म.-अंगणो.) याथ३(३-३ म.-अभिनिब्बज्जियाथ; रो.- अभिनिब्बिज्जयाथ; अ.- अभिनिब्बज्जियाथ.) नं।
कारण्डवं निद्धमथ कसम्बुं अपकस्सथ४(४ म.- अवकस्सथ.)।।८।।

२८२ ततो पलापे वाहेथ अस्समणे समणमानिने।
निद्धमित्वान पापिच्छे पापआचारगोचरे।।९।।

मराठीत अनुवाद :-

२७८. तो अशा त-हेचा अधोगतीला गेलेला भिक्षु, गर्भशय्येपासून व तमापासून तमाला जाऊन, परलोकीं दु:ख भोगतो. (५)

२७९. जसा अनेक वर्षांचा भरलेला शौचकूप, तशाप्रमाणें जो दुर्गंधी आहे, अशा पापी पुरुषाची शुद्धि होणें मोठें कठीण. (६)

२८०. भिक्षूंनो, असा गृहासक्त, पापेच्छ, पाप-संकल्पी आणि पापी अचारगोचर असलेला तुम्हांस आढळला, (७)

२८१. तर सगळे एकवटून त्याच्यावर बहिष्कार घाला, तो कचरा फेकून टाका; तो सडलेला भाग काढून काढा. (८)

२८२. तदनंतर श्रमण नसून स्वत:ला श्रमण मानणारे अशा फोल भुक्षूंना बाहेर काढा. तशा पापेच्छ व पापी आचारगोचर असलेल्यांना घालवून देऊन, (९)
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel