पाली भाषेत :-

१०९८ कामेसु विनय१(१ सी.-विनेय,) गेधं (जतुकण्णी ति भगवा) नेक्खम्मं दट्ठु२(२ म.-दट्ठुं ) खेमतो।
उग्गहीतं निरत्तं वा मा ते विज्जित्थ३(३ म.- विजि, सी. विज्ज.) किञ्चिनं।।३।।

१०९९ यं पुब्बे तं विसोसेहि४(४ म.-विसा.) पच्छा ते माऽहु किञ्चनं।
मज्झे चे नो गहेस्ससि उपसन्तो चरिस्ससि।।४।।

११०० सब्बतो नामरूपस्मिं वीतगेधस्स ब्राह्मण।
(५म.-आसवऽस्स.)आसवाऽस्स न विज्जन्ति येहि मच्चुवसं वजे ति।।५।।

जतुकण्णिमाणवपुच्छा निट्ठिता।

मराठीत अनुवाद :-

१०९८ निर्वाणपद क्षेमकर आहे असें जाणून — हे जतुकण्णि, असें भगवान् म्हणाला —कामोपभोगांचा लोभ सोड, व तूं स्वीकारलेलें किंवा धिक्कारलेलें१ (१ गाथा ७८७, ८५८, ९१९ पहा.) असें कांहीहीं असूं देऊं नकोस.(३)

१०९९ जें पूर्वकालीन तें शोषित कर, आणि भविष्यकाळीं कांहीं राहूं देऊं नकोस; व वर्तमानकाळाला जर तूं पकडून बसणार नाहींस, तर उपशान्त होऊन हिंडत राहशील. (४)

११०० हे ब्राह्मणा, नामरूपांविषयीं सर्वथा वीतलोभ झालेल्या माणसाला, ज्यांहींकरून तो मृत्यूला वश होईल असे आश्रव राहत नाहींत. (५)

जतुकण्णिमाणवपुच्छा समाप्त

पाली भाषेत :-

६७
[१३. भद्रावुधमाणवपुच्छा (१२)]

११०१ ओकं१(१म.-ओघं. ) - जहं २(२ सी.-कण्ह. )तण्हच्छिदं अनेजं (इच्चायस्मा भद्रावुधो)। ३नन्दिं-जहं४(३-४ म.-नन्दिज्जहं, कप्पज्जहं, ) ओघतिण्णं विमुत्तं। 
कप्पं-जहं अभियाचे सुमेधं। सुत्वान नागस्स अपनमिस्सन्ति५( ५म.-अपलामिस्सन्ति  ) इतो।।१।।

११०२ नाना जना जनपदेहि संगता। तव वीर६( ६म.-चीरं ) वाक्यं अभिकंखमाना।
तेसं तुवं साधु वियाकरोहि। तथा हि ते विदितो एस धम्मो।।२।।

मराठीत अनुवाद :-

६७
[१३. भद्रावुधमाणवपुच्छा (१२)]


११०१ गृहत्यागी, तृष्णेचा उच्छेद करणारा, अप्रकम्प्य — असें आयुष्मान् भद्रावुध म्हणाला — आसक्तीचा त्याग करणारा, ओघतीर्ण, विमुक्त, विकल्पत्यागी व सुमेध, अशा तुजपाशीं मी (धर्मोपदेशाची) याचना करतों. तुझा, नागाचा, उपदेश ऐकून येथून हे जन संतुष्ट होऊन जातील.(१)

११०२ हे वीरा, तुझें भाषण ऐकण्याच्या इच्छेनें हे जन देशांतून येथें जमा झाले आहेत. त्यांना तुझा धर्म नीट समजावून सांग. कां कीं, हा तुला चांगला समजतो. (२)
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel