पाली भाषेत :-

१०२५ मुद्धं१(१ सी.-मुद्धा) मुध्दाधिपातं च बावरि परिपुच्छति।
तं व्याकरोहि भगवा कंखं विनय नो इसे।।५०।।

१०२६ अविज्जा मुद्धा ति२(२-२म.-विजानाहि.) जानाहि२ विज्जा मुद्धाधिपातिनी।
सद्धासतिसमाधीहि छन्दविरियेन संयुता।।५१।।

१०२७ ततो वेदेन महता संथंभित्वान३(३सी.-सत्थाम्हित्वान, संथंभेत्वान.) माणवो।
एकंसं अजिनं कत्वा पादेसु सिरसा पति।।५२।।

१०२८ बावरि ब्राह्मणो भोतो सह सिस्सेहि मारिस।
उदग्गचित्तो सुमनो पादे वन्दति चक्खुम४(४ सी., म., Fsb.-चक्खुमा.)।।५३।। 

मराठीत अनुवाद :-

१०२५ (अजित-) हे भगवन्, बावरि डोकें व डोकें फुटणें म्हणजे काय हें विचारतो. हे ऋषे, त्याचें उत्तर देऊन आमची शंका दूर कर.(५०)

१०२६ “डोकें म्हणजे अविद्या, आणि डोकें फोडणारी म्हणजे श्रद्धा, स्मृति, समाधि, कुशलच्छंद व उत्साह यांहीं संपन्न अशी विद्या (प्रज्ञा) असे समज.” (५१)

१०२७ तेव्हां त्या अजित माणवानें मोठ्या आनंदानें, मनाचा निर्धार करून व अजिनचर्म एकाच खांद्यावरून पांघरून भगवंताच्या पायांवर आपलें डोकें ठेवलें.(५२)

१०२८ (अजित-) हे मारिषा, हे चक्षुष्मन्, बावरि१ (१ शिष्याच्या रूपानें) ब्राह्मण, शिष्यांसह, हर्षित आणि आनंदित होऊन तुझ्या पायां पडत आहे.(५३)

पाली भाषेत :-

१०२९ सुखितो बावरि होतु सह सिस्सेहि ब्राह्मणो।
त्वं चापि१(१म.-वाऽपि.) सुखितो होहि चिरं जीवाहि माणव।।५४।।

१०३० बावरिस्स च तुय्हं वा सब्बेसं सब्बसंसयं।
कतावकासा पुच्छव्हो यं किञ्चि मनसिच्छथ।।५५।।

१०३१ संबुद्धेन कतोकासो निसीदित्वान पञ्जलि२(२सी., म.-ली.)
अजितो पठमं पञ्हं तत्थ पुच्छि तथागतं।।५६।।

वत्थुगाथा३(३ म.-कथा निट्ठिता कथं निट्ठितं.) निट्ठिता ।


मराठीत अनुवाद :-

१०२९ (भगवान्-) हे माणवा, बावरि ब्राह्मण शिष्यांसह सुखी होवो, आणि तूंही सुखी व चिरंजीव हो. (५४)

१०३० बावरीला, तुला किंवा तुम्हां सर्वांना ज्या शंका असतील त्या सर्व विचारण्यास मी मोकळीक देतों; तुमच्या मनांत जें असेल तें तुम्ही विचारा.(५५)

१०३१ संबुद्धानें मोकळीक दिली असतां अजितानें तेथें खालीं बसून व हात जोडून तथागताला प्रथमत: प्रश्न विचारला.(५६)

प्रास्ताविक गाथा समाप्त
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel