पाली भाषेत :-

३९८ मज्जं च पानं न समाचरेय्य। धम्मं इमं रोचये यो गहट्ठो।
न पायये पिबतं१(१ रो.-पिपतं, म.-पिवतं.) नानुजञ्ञा। उम्मादनं तं इति नं विदित्वा।।२३।।

३९९ मदा हि पापानि करोन्ति बाला। कारेन्ति चऽञ्ञेऽपि जने पमत्ते।
एतं अपुञ्ञायतनं विवज्जये। उम्मादनं मोहनं बालकन्तं।।२४।।

४०० पाणं न हाने न चादिन्नमादिये। मुसा न भासे न च मज्जपो सिया।
अब्रह्मचरिया विरमेय्य मेथुना। रत्तिं न भुजेय्य विकालभोजनं।।२५।।

मराठीत अनुवाद :-

३९८. जो गृहस्थ हा (बुद्ध-) धर्म१ (१ टीकाकार जरा वेगळा अर्थ देतो—‘ज्याला मद्यपान न करण्याचा धर्म आवडत असेल, त्यानें दुसर्याला मद्य देऊं नये...वगैरे.’) पाळतो त्यानें मद्यपान करूं नये, दुसर्या ला मद्य देऊं नये, व पिणार्याला संमति देऊं नये; तें उन्मादक आहे, असें जाणून वर्तावें. (२३)

३९९. कारण, दारूच्या गुंगीनें मूर्ख लोक पापाचरण करतात. व प्रमत्त लोकांचेकडूनही पापाचरण करवतात. पापाचें आयतन, उन्मादकारक, मोहकारक व मूर्खप्रिय असें हें कृत्य वर्ज्य करावें.(२४)

४००. प्राणघात करूं नये, चोरी करूं नये. खोटें बोलूं नये, मद्यपी होऊं नये, अब्रह्मचर्यापासून म्हणजे स्त्रीसंगापासून विरक्त व्हावें आणि अकालीं म्हणजे रात्रीं जेवूं नये.(२५)

पाली भाषेत :-

४०१ मालं न धारे१(१ रो.-धारये.) न च गन्धमाचरे | मंचे छमायं च२( २ रो.-व.) सयेथ सन्थते।
एतं हि अट्ठंगिकमाहु पोसथं। बुद्धेन दुक्खऽन्तगुना पकासितं।।२६।।

४०२ ततो च पक्खस्सुपवस्सुपोसथं। चातुद्दसिं पंचदसिं च अट्ठमिं।
पाटिहारियपक्खं च पसन्नमानसो। अट्ठंगुपेतं सुसमत्तरूपं।।२७।।

४०३ ततो च पातो उपवुत्थुपोसथो। अन्नेन पानेन च भिक्खुसंघं।
पसन्नचित्तो अनुमोदमानो। यथारहं संविभजेथ विञ्ञू।।२८।।

मराठीत अनुवाद :-


४०१. मला धारण करूं नये, सुगंधी द्रव्यें लावूं नयेत, साध्या खाटेवर किंवा जमिनीवर कांहीं हांथरून निजावें. दु:खाच्या पार गेलेल्या बुद्धानें प्रकाशित केलेला असा हा अष्टांग उपोसथ आहे असें म्हणतात.(२६)

४०२. आणि हा अष्टांगोपेत, सुसंपन्न उपोसथ दरपंधरवड्याला, चतुर्दशी, पंचदशी आणि अष्टमी या तीन दिवशीं व प्रातिहार्य-पक्षांत१ (१ ह्या शब्दाचे टीकाकारानें तीन अर्थ दिले आहेत--१)आषाढ मास, वर्षाकालांतील तीन महिने व कार्तिक मास असे पांच महिने. २)आषाढ, कार्तिक व फाल्गुन हे तीन महिने. ३) वर सांगितलेल्या तीन उपवासाच्या दिवशींच्या आधींचे व नंतरचे दिवस; म्हणजे त्रयोदशी व प्रतिपदा आणि सप्तमी व नवमी असे चार दिवस.) प्रसन्न मनानें पाळावा.(२७)

४०३. तदनंतर उपोसथ पाळल्यावर दुसर्या  दिवशीं सकाळी त्या सुज्ञानें प्रसन्न चित्तानें भिक्षुसंघाला संतुष्ट करून भिक्षूंना यथायोग्य अन्न आणि पान वाटावें.(२८)
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel