पाली भाषेत :-

८६५ छन्दानिदानानि पियानि लोके। ये वाऽपि लोभा विचरन्ति लोके।
आसा च निट्ठा च इतोनिदाना। ये संपरायाय नरस्स होन्ति।।४।।

८६६ छन्दो नु लोकस्मिं कुतोनिदानो। विनिच्छया वाऽपि कुतो पहूता।
कोधो मोसवज्जं च कथंकथा च। यो वाऽपि धम्मा समणेन वुत्ता।।५।।

८६७ सातं असातं ति यमाहु लोके। तमूपनिस्साय पहोति छन्दो।
रूपेसु दिस्वा विभवं भवं च। विनिच्छयं कुरुते जन्तु लोके।।६।।

८६८ कोधो मोसवज्जं च कथंकथा च। एतेऽपि धम्मा द्वयमेव सन्ते।
कथंकथी ञाणपथाय सिक्खे। ञत्वा पवुत्ता समणेन धम्मा।।७।।

मराठी अनुवाद :-

८६५ “या जगांत वस्तू छंदामुळें प्रिय होतात. जगांत वावरणारे लोभ छंदामुळें होतात; माणसांच्या पुनर्भवाला ज्या कारणीभूत होतात त्या आशा आणि निष्ठा (फलप्राप्ति) यामुळें होतात.” (४)

८६६. “जगांत छंद कशामुळें होतो? ठाम मतें कोठून उत्पन्न होतात? आणि क्रोध, लबाडी, कुशंका किंवा श्रमणानें (बुद्धानें) दाखवून दिलेले असे दुसरे (दोष) कशामुळें होतात?” (५)

८६७ “ज्याला जगांत सुख आणि दु:ख म्हणतात त्यापासून छंद उत्पन्न होतो. (मनाचे विषय बनलेल्या) रूपांमधील उत्पाद आणि व्यय पाहून प्राणी जगांत ठाम मतें बनवतो. (६)

८६८ क्रोध, लबाडी आणि कुशंका या गोष्टीही याच द्वयामुळें (सुखदु:खामुळें) उत्पन्न होतात. श्रमणानें ज्ञान मिळवून हे (कुशलाकुशल) धर्म दाखवून दिले आहेत. म्हणून संशयग्रस्त माणसानें त्याचा धर्ममार्ग शिकावा.” (७)

पाली भाषेत :-

८६९ सातं असातं च कुतोनिदाना। किस्मिं असन्ते न भवन्ति हेते।
विभवं भवं चापि यमेतमत्थं। एतं मे पब्रूहि यतोनिदानं।।८।।


८७० फस्सनिदानं१ सातमसातं। फस्से असन्ते न भवन्ति हेते। (१ नि.-फस्सं निदानं.)
विभवं भवं चापि यमेतमत्थं। एतं ते पब्रूहि इतोनिदानं।।९।।


८७१ फस्सो नु लोकस्मिं कुतोनिदानो। परिग्गहा चापि२ कुतो पहूता। (२ वाऽपि.)
किस्मिं असन्ते न ममत्तमत्थि। किस्मिं विभूते न फुसन्ति फस्सा।।१०।।


८७२ नामं च रूपं च पटिच्च फस्सा। इच्छानिदानानि परिग्गहानि।
इच्छा३ न सन्त्या३ न ममत्तमत्थि। रूपे विभूते न फुसन्ति फस्सा।।११।। (३-३म., नि.-इच्छायऽसन्त्या.)

मराठी अनुवाद :-

८६९ “सुख आणि दु:ख हीं कशामुळें होतात? कोणत्या गोष्टीचा नाश झाल्यानें हीं होत नाहींत? आणि (ह्यांचाच) लाभ आणि हानि कशामुळें होतात हेंही मला सांग.” (८)

८७० “स्पर्शामुळें सुख आणि दु:ख हीं होतात; स्पर्श नसला तर हीं होत नाहींत; (ह्यांचा) लाभ आणि (ह्यांची) हानिही याचमुळें होते. असें मी म्हणतों.” (९)

८७१ “जगांत स्पर्श कशामुळें होतो? परिग्रह कशामुळें उत्पन्न होतात? कशाचा नाश झाला असतां ममत्व राहत नाहीं? आणि कशाच्या नाशानें स्पर्श उत्पन्न होत नाहीं?” (१०)

८७२ “नाम आणि रूप यांवर अवलंबून स्पर्श उत्पन्न होतात; इच्छेमुळें परिग्रह उत्पन्न होतात. इच्छा नष्ट झाली तर ममत्व राहत नाहीं, आणि रूप-(विचार) नष्ट झाल्यानें स्पर्श उत्पन्न होत नाहीं. (११)
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel