पाली भाषेत :-

८७३ कथं-समेतस्स विभोति रूपं। सुखं दुखं वाऽपि कथं विभोति।
एतं मे ब्रूहि यथा विभोति। तं जानियाम१ इति मे मनो अहु।।१२।। (१ म.-जानिस्साम.)

८७४ न सञ्ञसञ्ञी न विसञ्ञसञ्ञी । नोऽपि असञ्ञीन विभूतसञ्ञी।
एवं समेतस्स विभोति रूपं । सञ्ञानिदाना हि पपञ्चसंखा।।१३।।

८७५ यं तं अपुच्छिम्ह अकित्तयी२ नो । अञ्ञं तं पुच्छाम तदिङ्घ ब्रूहि। (२ म.-अकित्तयि.)
एत्तावतग्गं नो वदन्ति हेक। यक्खस्स सुद्धिं इध पण्डितासे।
उदाहु अञ्ञंऽपि वदन्ति एत्तो।।१४।।

मराठी अनुवाद :-


८७३ “कोणत्या गुणांनीं युक्त झाल्यानें रूप - विचार नष्ट होतो? सुख आणि दु:ख कशामुळें नष्ट होतें? हीं कशीं नष्ट होतात, हे मला सांग. तें जाणण्याची माझी इच्छा आहे.” (१२)

८७४ “(प्राकृतिक) संज्ञा नसलेला, किंवा ज्याची संज्ञा नष्ट झाली आहे असा (वेडा किंवा भ्रमिष्ट) नसणारा, (निरोध - समाधि प्राप्त झाल्यामुळें किंवा असंज्ञी - सत्त्व बनल्यामुळें) संज्ञाविहीन झाला आहे असेंही नसणारा, किंवा (अरूपध्यान प्राप्त झाल्यामुळें) रूपें ओलांडलीं आहेत असें ही नसणारा - अशा गुणांनीं जो युक्त, त्याचा रूपविचार नष्ट होतो. कारण ज्याला प्रपंच म्हणतात तो ह्या संज्ञेमुळें होतो१?” (१ टीकाकाराला अनुसरून ह्या कूटगाथेचा अर्थ दिलेला आहे.) (१३)

८७५ “जें आम्हीं विचारलें, तें तूं आम्हांस सांगितलेंस. आता तुला आम्ही आणखी एक विचारतों तें कृपा करून सांग. या जगांत जे पंडित आहेत, ते (रूपविचाराचा नाश) हीच अग्र आत्मशुद्धि म्हणतात काय? किंवा याहून अन्य शुद्धि समजात?” (१४)

पाली भाषेत :-

८७६ एत्ता वतग्गंऽपि वदन्ति हेके । यक्खस्स सुद्धिं इध पण्डितासे।
तेसं पुनेके समयं वदन्ति। अनुपादिसेसे कुसला वदाना।।१५।।

८७७ एते च ञत्वा उपनिस्सिता ति। ञत्वा मुनी१ निस्सये सो विमंसी। (१ म.-मुनि.)
ञत्वा विमुत्तो न विवादमेति। भवाभवाय न समेति धीरो ति।।१६।।

कलहविवादसुत्तं निट्ठितं।

मराठी अनुवाद :-

८७६. “या जगांत कित्येक पंडित हीच अग्र आत्मशुद्धि असें म्हणतात. पण दुसरे कांहीं आपणाला अनुपादिशेष (निरोधांत) कुशल समजणारे आपला उच्छेदवाद अग्र आहे असें सांगतात. (१५)

८७७. पण हे सर्व उपनिश्रित (आश्रित) आहेत असें जाणून मुनि यांच्या आश्रयांची मीमांसा करून ज्ञान मिळवून मुक्त होतो, आणि वादांत पडत नाहीं; आणि तो सुज्ञ (पुढें) कोणच्याही भवांत जन्म घेत नाहीं. (१६)

कलहविवादसुत्त समाप्त
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel