पाली भाषेत :-

३७८ सब्बं तुवं ञाणमवेच्च धम्मं। पकासेसि सत्ते अनुकंपमानो।
विवत्तच्छ १द्दोऽसि(१ म.- विवटच्छदोऽसि. ) समन्तचक्खु। विरोचसि विमलो सब्बलोके।।३।।

३७९ आ २गच्छि(२ सी.-आगञ्छि.) ते सन्तिके नागराजा। एरावणो नाम जिनो ति सुत्वा।
सोऽपि तया मन्तयित्वा अज्झगमा। साधू ति सुत्वान पतीतरूपो।।४।।

३८० राजाऽपि तं वेस्सवणो कुवेरो। उपेति धम्मं परिपुच्छमानो।
तस्सापि त्वं पुच्छितो ब्रूसि धीर। सो चापि सुत्वान पतीतरूपो।।५।।

३८१ ये केचि मे तित्थिया वादसीला। आजीविका वा यदि वा निगण्ठा।
पञ्ञाय तं नातितरन्ति सब्बे। ठितो वजन्तं विय सीघगामिं।।६।।

मराठीत अनुवाद :-

३७८. तूं सर्व ज्ञानाचा बोध करून घेऊन प्राण्यांच्यावरील दयेमुळें धर्म प्रकाशित करतोस. (लोभ, द्वेष आणि मोह यांचें) आवरण तूं दूर सारलें आहेस. समन्तचक्षु, तूं सर्व लोकांत निर्मळपणें प्रकाशतोस. (३)

३७९. तूं जिन आहेस हें ऐकून ऐरावत नागराजा तुजपाशीं आला. व तो देखील तुझ्याशीं सल्लामसलत करून प्रसन्न चित्तानें तुला धन्यवाद देऊन जाता झाला. (४)

३८०. वैश्रवण कुबेर राजा देखील धर्म विचारण्यासाठीं तुजप्रत येतो. हे धीर, त्यालाही तूं विचारल्यावरून योग्य उत्तर देतोस, आणि तोहि तुझें भाषण ऐकून प्रसन्नचित्त होतो. (५)

३८१. उभा राहणारा जसा धावणाराचा पाठलाग करूं शकत नाहीं, तसे आजीवक, निर्ग्रन्थ इत्यादिक वादशील तीर्थंकर श्रावक प्रज्ञेच्या बाबतींत तुला मागें टाकूं शकत नाहींत. (६)

पाली भाषेत :-

३८२ ये केचि मे ब्राह्मणा वादसीला। वुद्धा चापि ब्राह्मणा सन्ति केचि।
सब्बे तयि अत्थबद्धा भवन्ति। ये वाऽपि चऽञ्ञे वादिनो मञ्ञमाना।।७।।

३८३ अयं हि धम्मो निपुणो सुखो च१(१ सी., म.-सुखोऽव.)। योऽयं तया भगवा सुप्पवुत्तो।
तमेव सब्बे सुस्सूसमाना। त्वं नो वद पुच्छितो बुद्धसेट्ठ।।८।।

३८४ सब्बेऽपि मे२(२.- सब्बे चिमे.) भिक्खवो संनिसिन्ना। उपासका चापि तथेव३(३ म.-तत्थेव.) सोतुं।
सुणन्तु धम्मं विमलेनानुबद्धं। सुभासितं वासवस्सेव देवा।।९।।

३८५ सुणाथ मे भिक्खवो सावया४मि(४ म.-सावयिस्सामि.) वो। धम्मं धुतं तं च धराथें५(५ म.-चरथ.) सब्बे।
इरियापथं पब्बजितानुलोमिकं। सेवेथ नं अत्थदस्सी मुतीमा ६(६म-अत्थदस्सो मतिमा. अ.-अत्थदस्सो मुतीमा.)।।१०।।

मराठीत अनुवाद :-

३८२. जे कोणी वादशील तरुण किंवा वृद्ध ब्राह्मण, अथवा दुसरे कोणी आपणांस वादप्रवीण समजणारे, ते देखील तुजपासून अर्थज्ञान मिळवूं पाहतात. (७)

३८३. हे भगवन्, हा जो सूक्ष्म आणि सुखावह धर्म तूं उत्तम रीतीनें सांगितलास, तोच ऐकण्याच्या इच्छेनें आम्ही सर्वं आलों आहोंत. हे बुद्धश्रेष्ठा, तो तुला विचारला असतां आम्हांस सांग. (८)

३८४. हे सर्व भिक्षु तसेच सर्व उपासक, तुझें भाषण ऐकण्यासाठीं येथें बसले आहेत. इन्द्राचें सुभाषित वचन जसें देव ऐकतात, तसें निर्मळ असलेल्या बुद्धानें जो धर्म जाणलेला आहे, तो ते ऐकोत. (९)

३८५. (भगवान्-) भिक्षूंनो, माझें ऐका. धूतपाप असा धर्म तुम्हांस सांगतों, तो तुम्ही सर्व धारण करा. अर्थदर्शी मतिमान् भिक्षूनें परिव्राजकाला अनुरूप अशी हालचाल स्वीकारावी. (१०)
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel