पाली भाषेत :-

११३० अपारा पारं गच्छेय्य भावेन्तो मग्गमुत्तमं।
मग्गो सो१( १ सी., Fsb- [सो ] ) पारंगमनाय२(२ सी.-पारगम.) तस्मा पारायणं इति।।७।। 

११३१ पारायणमनुगायिस्सं (इच्चायस्मा पिंगियो)
यथा३(३ म.- तथा.) अद्दक्खि तथा अक्खासि४( ४ म.- यथादक्खि तथाक्खासि; Fsb. [यथा...अक्खासि]) विमलो भूरिमेधसो।
निक्कामो५( ५ अ.-निक्कमो, निक्खामो.) निब्बनो६( ६ म.-निप्पुनो, निब्बूनो.) नाथो७( ७ म., नि.- नागो.) किस्स हेतु मुसा भणे।।८।।

११३२ पहीनमलमोहस्स मानमक्खप्पहायिनो।
हन्दाहं कित्तयिस्सामि गिरं वण्णूपसंहितं।।९।।

मराठीत अनुवाद :-

११३० त्या उत्तम मार्गाची भावना करून तो (संसाराच्या) अलिकडल्या तीरापासून पलीकडल्या तीराला जाईल. तो मार्ग पार जाण्यासाठीं आहे म्हणून त्याला ‘पारायण’ असें म्हणतात. (७)

११३१ पारायणाचें मी अनुगान करतों - असें आयुष्मान् पिंगिय म्हणाला - विमल विपुलप्रज्ञानें (बुद्धानें) जसा हा मार्ग जाणला, तसा उपदेशिला. तो निष्काम आणि निस्तृष्ण नाथ कोणत्या उद्देशानें खोटें बोलेल? (८)

११३२ ज्याचे मल आणि मोह नष्ट झाले आहेत आणि त्यानें अहंकाराचा व (परगुणाबद्दलच्या) तिरस्काराचा त्याग केला आहे, त्याच्या सुंदर वाणीचें मी वर्णन करीत राहीन. (९)

पाली भाषेत :-

११३३ तमोनुदो बुद्धो समन्तचक्खु। लोकन्तगू सब्बभवातिवत्तो।
अनासवो सब्बदुक्खप्पहीनो। सच्चव्हयो ब्रह्मे१(१ सी., म., Fsb.-ब्रह्म.) उपासितो मे।।१०।।

११३४ दिजो यथा कुब्बनकं पहाय। बहुप्फलं काननं आवसेय्य।
एवंऽपहं अप्पदस्से२(२ म.- दसे.) पहाय। महोदधिं हंसरिवऽज्झपत्तो३(३ म. - हंसोरिवज्झुपत्तो)।।११।।

११३५ ये मे पुब्बे वियाकंसु हुरं गोतमसासना। “इच्चासि, इति भविस्सति”।
सब्बं तं इतिहीतिहं सब्बं तं तक्कवड्ढनं।।१२।।

११३६ एको४(४ सी.- एसो.) तमुनदासीनो५( ५ सी. - तमनुद्दोसीनो.) जातिमा६(६ म.- जुतिमा.) सो पभंकरो।
गोतमो भूरिपञ्ञाणो गोतमो भूरिमेधसो।।१३।।

मराठीत अनुवाद :-

११३३ तमाचा नाश करणारा, समन्तचक्षु, संसारपारग, सर्व भवाच्या पलीकडे गेलेला, अनाश्रव आणि सर्व दुःखापासून मुक्त, असा हा बुद्ध आहे. हे ब्राह्मणा, त्या नावांप्रमाणें वर्तणार्‍या बुद्धाची मीं उपासना केली. (१०)

११३४ ओसाड जंगल सोडून पक्षी जसा फलसंपन्न वनांत जातो, किंवा हंस जसा मोठ्या सरोवराला जातो, त्याप्रमाणें अल्पप्रज्ञांना सोडून मी येथें (गोतमापाशीं) आलों. (११)

११३५ गोतमाच्या उपदेशापूर्वीं मला जे सांगत कीं, ‘हें असें होतें आणि हें असें होईल’, तें सर्व केवळ परंपरागत आलेलें आणि तर्क वाढविणारें होतें. (१२)

११३६ पण हा विपुलप्रज्ञ गोतम, हा विपुलबुद्धि गोतम — एवढाच एक तमाचा नाश करणारा व खरा प्रकाश पाडणारा मला आढळला. (१३)
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel