पाली भाषेत :-

३९० वादं हि एके पटिसेनियन्ति। न ते पसंसाम परित्तपञ्ञे।
ततो ततो ने पसजन्ति संगा। चित्तं हि ते तत्थ गमेन्ति दूरे।।१५।।

३९१ पिण्डं विहारं सयनासनं च। आपं च संघाटिरजूपवाहनं।
सुत्वान धम्मं सुगतेन देसितं। संखाय सेवे वरपञ्ञसावको।।१६।।

३९२ तस्मा हि पिण्डे सयनासने च। आपे च संघाटिरजूपवाहने।
एतेसु धम्मेसु अनूपलित्तो। भिक्खु यथा पोक्खरे वारिबिन्दु।।१७।।

३९३ गहट्ठवत्तं पन वो वदामि। यथाकरो सावको साधु होति।
न हेसो लब्भा सपरिग्गहेन। फस्सेतुं यो केवलो भिक्खुधम्मो।।१८।।

मराठीत अनुवाद :-

३९०. वाद उत्पन्न झाला असतां कित्येक त्यांत भाग घेऊन इतरांचा पराजय करूं पाहतात. त्या अल्पबुद्धी लोकांची आम्ही प्रशंसा करीत नाहीं. कारण, त्या त्या विषयांत त्यांना आसक्ति होते व आपलें चित्त कर्तव्यापासून ते दूर दवडावतात.(१५)

३९१. वरप्रज्ञाच्या (बुद्धाच्या) श्रावकानें, सुगतानें उपदेशिलेला धर्म ऐकून, भिक्षा, विहार, राहण्याची जागा, पाणी आणि चीवरें धुणें—यांचें मोठ्या विचारानें सेवन करावें.(१६)

३९२. म्हणून भिक्षा, विहार, राहण्याची जागा, पाणी आणि चीवरें धुणें—या गोष्टींत अनुपलिप्त होऊन भिक्षूनें कमलावरील जलबिन्दूप्रमाणें राहावें.(१७)

३९३. आतां ज्या रीतीनें वागणारा श्रावक सज्जन होतो, तें गृहस्थाचें व्रत मी सांगतों. सपरिग्रह गृहस्थाला संपूर्ण भिक्षुधर्माप्रमाणें वागणें शक्य नाहीं.(१८)

पाली भाषेत :-

३९४ पाणं न हाने न च घातयेय्य। न चानुजञ्ञा हननं परेसं।
सब्बेसु भूतेसु निधाय दण्डं। ये थावरा ये च तसन्ति लोके।।१९।।

३९५ ततो अदिन्नं परिवज्जयेय्य। किंचि क्कचि सावको बुज्झमानो।
न हारये हरतं नानुजञ्ञा। सब्बं अदिन्नं परिवज्जयेय्य।।२०।।

३९६ अब्रह्मचरियं परिवज्जयेय्य। अंगारकासुं जलितं व विञ्ञू।
असंभुणन्तो पन ब्रह्मचरियं। परस्स दारं नातिक्कमेय्य।।२१।।

३९७ सभग्गतो वा परिसग्गतो वा। एकस्स वे१को(१ सी.-चेको.) न मुसा भणेय्य।
न भासये भणतं नानुजञ्ञा। सब्बं अभूतं परिवज्जयेय्य।।२२।।

मराठीत अनुवाद :-

३९४. त्यानें प्राणहानि करूं नये, करवूं नये, किंवा तसें करणार्यां ना संमति देऊं नये; सर्व भूतमात्रांविषयीं, मग ते स्थिर असोत वा चर असोत, दण्डबुद्धि सोडून वर्तावें.(१९)

३९५. जाणत्या श्रावकानें त्यानंतर कोठेंही कशाचीहि चोरी सोडून द्यावी, दुसर्या कडून चोरी करवूं नये व चोरी करणार्या ला संमति देऊं नये; या प्रमाणें सर्व अदत्तादान वर्ज्य करावें.(२०)

३९६. सुज्ञ ज्याप्रमाणें धगधगीत जळणार्या  कोळशांची खाई वर्ज्य करतो, त्याप्रमाणें त्यानें अब्रह्मचर्य वर्ज्य करावें. पण जर ब्रह्मचर्य पाळण शक्य नसेल, तर निदान परदारगमन करूं नये.(२१)

३९७. सभेंत असतां किंवा परिषदेंत असतां, अथवा एकटाच दुसर्यां शीं बोलत असतां खोटें बोलूं नये, दुसर्या कडून बोलवूं नये, आणि खोटें बोलणार्या ला संमति देऊं नये. याप्रमाणें सर्व असत्य वर्ज्य करावें.(२२)
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel