पाली भाषेत :-

१०७१ सब्बेसु कामेसु यो वीतरागो (इच्चायस्मा उपसीवो)। आकिञ्चञ्ञं निस्सितो हित्वमञ्ञं१ (१ सी., म.- हित्वा अञ्ञं. )
सञ्ञाविमोक्खे२(२ म.-विमुखे, विमोक्खे. ) परमेविमुत्तो३(३म., नि.-ऽधिमुत्तो )। तिट्ठे४ (४-४ म.-तिट्ठेय्य सो. ) नु ४सोतत्थ अनानुयायी५(५म.-धायि, वायि, तयि. )।।३।।

१०७२ सब्बेसु कामेसु यो वीतरागो (उपसीवा ति भगवा)। आकिञ्चञ्ञं निस्सितो हित्वमञ्ञं१(१ सी., म.- हित्वा अञ्ञं. )। 
सञ्ञाविमोक्खे परमे विमुत्तो। तिट्ठेय्य सो तत्थ अनानुयायी।।४।।

१०७३ तिट्ठे६ चे६ (६-६ सी.-तिट्ठेय्य  )सो तत्थ अनानुयायी। पूगंऽपि७(७म.-पूगं.) वस्सानं८(८म.-वस्सति, अ.-पूगानि वस्सानं. ) समन्तचक्खु।  
तत्थेव सो सीति सिया विमुत्तो। चवेथ९(९रो., सी.- भवेथ.) विञ्ञाणं तथाविधस्स।।५।।

मराठीत अनुवाद :-

१०७१ जो सर्व कामोपभोगांत वीतराग - असें आयुष्मान् उपसीव म्हणाला — अन्य पदार्थ सोडून आकिंचन्याचा आश्रय करणारा, आणि त्या परम संज्ञाविमुक्तीनें विमुक्त झालेला, तो
त्या भवांत स्थिर१( १ मूळ ‘अनानुयायी’ ह्या शब्दाचा अर्थ ‘कंप न पावणारा’ ‘न चळणारा’ असा ‘निद्देस’ ह्या जुन्या ग्रंथांत दिला आहे. ) राहूं शकेल काय? (३)

१०७२ जो सर्व कामोपभोगांत वीतराग — हे उपसीवा, असें भगवान् म्हणाला — अन्य पदार्थ सोडून आकिंचन्याचा आश्रय करणारा व त्या परम संज्ञाविमुक्तीनें विमुक्त झालेला, तो त्या भवांत स्थिर१ राहूं शकेल. (४)

१०७३ हे समन्तचक्षु, जर तो तेथें असंख्य वर्षे स्थिर राहिला, तर तो तेथेंच (निर्वाण-शान्ति) पावेल कीं त्याचें विज्ञान पुनर्जन्म घेईल? (५)

पाली भाषेत :-

१०७४ १(१ म.-अच्चि.)अच्ची यथा वातवेगेन खित्तो२(२म., नि.-खित्ता.) (उपसीवा ति भगवा)। अत्थं ३(३सी.- फलेति.)पलेति न उपेति संखं। 
एवं मुनि नामकाया विमुत्तो४(४म.- धिमुत्तो.)। अत्थं पलेति न उपेति संखं।।६।।

१०७५ अत्थं गतो सो उद वा सो नत्थि। उदाहु वे सस्सतिया अरोगो।
तं मे मुनि साधु वियाकरोहि। तथा हि ते विदितो एस धम्मो।।७।।

१०७६ अत्थं - गतस्स न पमाणमथि५(५सी.- मेति.) (उपसीवा ति भगवा) येन नं वज्जु६ (६म.- वज्जुं.) तं तस्स नत्थि।
सब्बेसु धम्मेसु समूहतेसु। समूहता वादपथा७ (७म.- मधा, बत्था.)पि सब्बे ति।।८।।

उपसीवमाणवपुच्छा निट्ठिता।

मराठीत अनुवाद :-


१०७४ दिव्याची ज्योत वार्‍याच्या वेगानें झपाटली गेली असतांना - हे उपसीवा, असें भगवान् म्हणाला - अस्ताला जाते आणि कोणतेंही नामाभिधान पावत नाहीं, त्याप्रमाणें नामकायापासून विमुक्त झालेला मुनि अस्ताला जातो आणि कोणतेंही नामाभिधान पावत नाहीं. (६)

१०७५ (उपसीव-) हे मुने, तो अस्ताला जातो, कीं नाश पावतो? किंवा तो सदासर्वदा अरोग होतो? हें मला नीट समजावून सांग. कारण हा धर्म तुला चांगला समजतो.(७)

१०७६ जो अस्तास जातो त्याला मोजमाप नाहीं - हे उपसीवा, असें भगवान् म्हणाला —ज्याच्यायोगें त्याला कांहीं नांव देतां येईल तें त्याला नाहीं. सर्वच पदार्थ लय पावले म्हणजे त्यांजविषयीं सर्व वाक्प्रचारही लय पावतात. (८)

उपसीवमाणवपुच्छा समाप्त
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel