पाली भाषेत :-

४० आमन्तना१ (१ म.- न्तणा.) होति सहायमज्झे वासे२ (२-२ म. वासेय्यठाने) ठाने३ (३ म.-अनतिच्छितं, अनभिच्छितं.) गमने चारिकाय।
अनभिञ्झितं सेरितं पेक्खमानो एको चरे खग्गविसाणकप्पो।।६।।

४१ खिड्डा रती होति सहायमञ्झे पुत्तेसु च विपुलं होति पेमं।
पियविप्पयोगं विदिगुच्छमानो एको चरे खग्गविसाणकप्पो।।७।।

४२ चातुद्दिसो अप्पटिघो च होति सन्तुस्समानो इतरीतरेन।
परिस्सयानं सहिता अछंभी४ (४ अ.-अच्छंभी.) एको चरे खग्गविसाणकप्पो।।८।।

४३ दुस्संगहा पब्बजिता पि एके अथो गहट्ठा घरमवासन्ता।
अप्पोस्सुको परपुत्तेसु हुत्वा एको चरे खग्गविसाणकप्पो।।९।।

मराठीत अनुवाद : -

४०. मित्रांबरोबर असल्यानें राहण्या-बसण्यासाठीं व जाण्या-येण्यासाठीं बोलावणें होतें, (पण) निर्लोभता ही स्वतंत्रता असें जाणून गेंड्याच्या शिंगाप्रमाणें एकाकी राहावें. (६)

४१. आप्तेष्टांबरोबर राहिल्यानें करमणूक आणि आनंद वाटतो, आणि मुलांवर फार प्रेम जडतें. (पण) प्रियांच्या वियोगामुळें उबग वाटून गेंड्याच्या शिंगाप्रमाणें एकाकी राहावें (७)

४२. कितीहि अल्पलाभ झाला तरी त्यांत संतोष मानणारा चार ही दिशांना जाण्याला मोकळा व अप्रतिबन्ध होतो. (म्हणून) विघ्नें सहन करून निर्भयपणें गेंड्याच्या शिंगाप्रमाणें एकाकी राहावें. (८)

४३. कित्येक संन्यासीहि असे असतात कीं, त्यांचा संग्रह करणें कठीण जातें, मग घरांत राहणार्‍या गृहस्थाश्रम्यांची (तर गोष्टच विचारावयास नको.) (म्हणून) इतरांच्या मुलांविषयीं बेफिकिर होऊन गेंड्याच्या शिंगाप्रमाणें एकाकी राहावें. (९)
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel