“हे केणिया, बुद्ध म्हणतोस?” “भो सेला, होय; मी बुद्ध म्हणतों.” हे केणिया, बुद्ध म्हणतोस?” भोसेला, होय; मी बुद्ध म्हणतों.” त्यावर सेल ब्राह्मणाला असें वाटलें कीं, बुद्ध हा शब्द देखील इहलोकी दुर्लभ आहे. आमच्या अध्ययनांत महापुरुषांची बत्तीस लक्षणें येतात. त्थांहीं सपन्न अशा महापुरुषाच्या दोनच गती होतात, तिसरी होत नाहीं. जर तो गृहस्थाश्रमी राहिला तर धार्मिक, धर्मराजा, चारही दिशांचा मालक, जयशाली, सर्व राज्यांवर स्वामित्व मिळविलेला व सात रत्नांनीं संपन्न असा चक्रवर्ती राजा होतो. त्यांची हीं सात रत्नें असतात. तीं अशीं:--चक्ररत्‍न, हस्तिरत्‍न, अश्वरत्‍न, मणिरत्‍न, स्त्रीरत्‍न, गृहपतिरत्‍न व सातवें परिणायक१रत्‍न. (१ प्रमुख अमात्याला ‘परिणायक’ असें म्हणतात.) त्याला शूर, वीर, परसेनेचें मर्दन करणारे असे एक हजाराहून जास्त पुत्र असतात. तो दण्डावांचून, शस्त्रावांचून ही सागरापर्यंतची पृथ्वी धर्मानें जिंकून राहतो. पण जर तो घर सोडून आनागारिक प्रव्रज्या घेईल तर जगांत (अज्ञानाचा) पडदा दूर सारणारा अर्हन् सम्यकसम्बुद्ध होईल.

“भो केणियो, तो भवान् गोतम अर्हन् सम्यकसंबुद्ध कोठें राहतो?” असे म्हटल्यावर केणिय जटिल उजवा हात पुढें करून सेल ब्राह्मणाला म्हणाला—“भो सेला, ही जी नील वनराजि दिसते तिकडे.” त्यावर तीनशें विद्यार्थ्यांसह सेल ब्राह्मण भगवन्तापाशी आला. तेव्हां सेल ब्राह्मण त्या विद्यार्थ्यांना म्हणाला—तुम्ही आवाज न करतां पावलामागें पावलें टाकून चला; कारण ते भगवन्त सिंहासारखे एकचर असून दुर्गम आहेत; आणि मी जेव्हां श्रमण गोतमाबरोबर बोलेन, तेव्हां तुम्ही मध्यें बोलूं नका; आमचें संभाषण संपण्याची वाट पहा. तेव्हां सेल ब्राह्मण भगवन्ताजवळ आला. येऊन त्यानें भगवन्ताला कुशल प्रश्न विचारले. कुशल प्रश्नादिक संभाषण आटोपून तो एका बाजूस बसला. एका बाजूला बसून सेल ब्राह्मण भगवन्ताच्या शरिरावर महापुरुषाचीं बत्तीस लक्षणें पाहूं लागला. सेल ब्राह्मणानें भगवन्ताच्या शरिरावर बत्तीसपैकीं दोन खेरीज करून बाकीचीं महापुरुषाचीं लक्षणें पाहिलीं. पण कोशावहित वस्त्रगुह्य व प्रभूतजिह्वा या दोन महापुरुष लक्षणांविषयीं त्याला शंका येऊं लागली. त्याची खात्री होईना. तेव्हां भगवंताला वाटलें कीं, हा सेल ब्राह्मण बत्तीसपैकीं दोन खेरीज करून बाकीची माझीं महापुरुषलक्षणें पाहतो; पण कोशावहित वस्त्रगुह्य व प्रभूतजिह्वा या दोन महापुरुषलक्षणांविषयीं त्याला शंका येते, विश्वास वाटत नाहीं. तेव्हां भगवन्तानें असा कांहीं ऋद्धिचमत्कार केला कीं, जेणेंकरून सेल ब्राह्मण भगवन्ताचें कोशावहित वस्त्रगुह्य पाहूं शकला, आणि भगवन्तानें जीभ बाहेर काढून जिभेंने झाकलें. तेव्हा सेल ब्राह्मणाला वाटलें कीं, हा श्रमण गोतम अपरिपूर्णांनीं नव्हे तर परिपूर्ण बत्तीस महापुरुषलक्षणांनीं युक्त आहे. पण तो बुद्ध आहे कीं नाहीं हें मला समजत नाहीं. परंतु वयोवृद्ध म्हातारे आचार्य प्राचार्य ब्राह्मण बोलत असतां मीं एकलें आहे कीं, जे अर्हन् सम्यक्संबुद्ध असतात, त्यांची स्तुति केली असतां ते स्वत:ला प्रकट करतात. म्हणून मीं श्रमण गोतमाची योग्य गाथांनीं समक्ष स्तुति करावी हें चांगलें. तेव्हां सेल ब्राह्मणानें भगवंताची योग्य गाथांनीं समक्ष स्तुति केली—
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel