पाली भाषेत :-

१४
[२. आमगन्धसुत्तं]


२३९ सामाकचिगूलक१( १ रो.- डिंगुलक.)चीनकानि२(२ म.-चीनकानि च.)। पत्तप्फलं मूलप्फलं गविप्फलं।
धम्मेन लद्धं सतमस्नमाना३(३ रो.-सतमञ्हमाना.सी.-सतमसमाना)। न कामकामा अलिकं भणन्ति।।१।।

२४० यदस्नमानो४(४ रो., सी.-यदञ्हमानो.) सुकतं सुनिट्ठितं। परंहि दिन्नं पयतं पणीतं।
सालीनमन्नं परिभुज्जमानो। सो भुञ्जसि५(५ रो. भुञ्जती, म.- भुञ्जति.) कस्सप आमगन्धं।।२।।

मराठीत अनुवाद :-

१४
[२. आमगन्धसुत्त]


२३९. (तिष्य तापस-) श्यामक, चिंगूलक१, (१ चिंगूलक= कण्हेराच्या फुलांच्या आकाराचें अरण्य-धान्य. चीनक=जंगली मूग) चीनक झाडांचीं पानें, कन्दमूळ आणि फळें योग्य मार्गानें मिळवून त्यांजवर निर्वाह करणारे कामानें प्रेरित होऊन खोटें बोलत नसतात. (१)

२४०. हे काश्यपा, परक्यांनीं दिलेलें निवडक व चांगल्या रीतीनें शिजविलेलें तांदुळाचें सुरस व उत्तम अन्न स्वीकारणारा तूं आमगंध२ (मूळ अर्थ—दुर्गंधी कच्चें मांस) (अमेध्य पदार्थ) खातोस! (२)

पाली भाषेत :-

२४१ न आमगन्धो मम कप्पती ति। इच्चेव त्वं भाससि बह्मबन्धु१(१ सी.-ब्रह्मबन्धुं.)
सालीनमन्नं परिभुञ्ञमानो। सकुन्तमंसेहि सुसंखतेहि।
पुच्छामि तं कस्सप एतमत्थं। कथप्पकारो तव आमगन्धो।।३।।

२४२ पाणातिपातो वध-छेद-बन्धनं। थेय्यं मुसावादो निकतिवञ्चनानि।
अज्झेनकुत्तं२( २ सी. अज्झेनकुज्झं; रो.- अज्झेनकुज्जं.) परदारसेवना। एसामगन्धो न हि मंसभोजनं।।४।।

२४३ ये इध कामंसु असञ्ञता जना। रसेसु गिद्धा असुचीकमिस्सिता३(३ म.- असुचिभावमिसिता.)
नत्थीक४( ४ रा., अ.-नत्थिकदिट्ठिं; म.-नत्थि कुदिट्ठि.) दिट्ठि विसमा दुरन्नया। एसामगन्धो न हि मंसभोजनं।।५।।

२४४ ये लूखसा दारुणा पिट्ठिमंसिका। मित्तद्दुनो निक्करुणातिमानिनो।
अदानसीला न च देन्ति कस्स चि। एसामगन्धो न हि मंसभोजनं।।६।।

मराठीत अनुवाद :-

२४१. हे ब्रह्मबन्धु, पक्ष्यांच्या मांसानें सुमिश्रित असें तांदुळाचें अन्न खात असतां, तूं ‘आपणांला आमगंध योग्य नाही’ असेंच म्हणतोस, तेव्हां हे काश्यपा, मी ही गोष्ट तुला विचारतों कीं, तुझा आमगंध कशा प्रकारचा आहे? (३)

२४२. (काश्यप बुद्ध-) प्राणघात, वध, छेद, बन्धन, चोरी, खोटें भाषण, ठकविणें, नाडणें, जारणमारणादिकांचा अभ्यास आणि परस्त्रीगमन—हा आमगंध होय; मांसभोजन हा नव्हे. (४)

२४३. ज्यांना स्त्रियांच्या बाबतींत संयम नाहीं, जे जिह्वालोलुप, अशुचि-कर्ममिश्रित, नास्तिक, विषम आणि दुर्विनीत, (अशांचें कर्म)—हा आमगंध होय; मांसभोजन हा नव्हे. (५)

२४४. जे रुक्ष, दारुण, पाठीमागें निंदा करणारे, मित्रद्रोही, निर्दय, अतिमानी, कृपण, कोणाला कांहीही देत नाहींत (अशांचें कर्म)—हा आमगंध होय; मांसभोजन हा नव्हे. (६)
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel