पाली भाषेतः-

७८७ उपयो हि धम्मेसु उपेति वादं। अनूपयं१(१ म. अनुपयं.) केन कथं वदेय्य।
अत्तं निरत्तं न हि तस्स अत्थि। अधोसि सो दिट्ठिमिधेव सब्बा२ (२ म.Fsb-ब.) ति।।८।।

दुट्ठट्ठकसुत्तं निट्ठितं।

४२
(४. सुद्धट्ठकसुत्तं)

७८८ पस्सामि सुद्धं परमं अरोगं। दिट्ठेन३(३ सी.-दिट्टिन.) संसुद्धि नरस्स होति।
एताभिजानं४ (४ म., नि.-एवमि.) परमं ति ञत्वा। सुद्धानुपस्सी ति पञ्चेति ञाणं।।१।।

मराठी अनुवादः-

७८७. कारण चंचळ माणूस पदार्थांच्या वादांत पडतो; पण निश्चळ माणसाला कोण कशामुळें व कां वादांत गुंतवील? कां कीं, त्यानें स्वीकारलेलें किंवा धिक्कारलेलें असें कांहीं नाहीं.१(१ ‘त्याला आत्मबुद्धि किंवा अनात्मबुद्धि नाहीं,’ असाही एक अर्थ टीकाकारानें दिला आहे.) त्यानें सर्व सांप्रदायिकता धुवून टाकली आहे.

दुट्ठट्ठकसुत्त समाप्त

४२
(४. सुद्धट्ठकसुत्त)

७८८ ‘मी अरोग आणि शुद्ध असें परम पाहतों; सांप्रदायिक दृष्टींमुळें मनुष्याची शुद्धि होते’—याप्रमाणें जाणणारा परम काय आहे तें जाणून शुद्धिही जाणतो अशी बुद्धि होते.(१)

पाली भाषेतः-

७८९ दिट्ठेन चे सुद्धि नरस्स होति। ञाणेन वा सो पजहति दुक्खं।
अञ्ञेन सो सुज्झति सोपधीको। दिट्ठी१(१ म.-दिट्ठि.) हि नं पाव तथा वदानं।।२।।

७९० न ब्राह्मणो अञ्ञतो सुद्धिमाह। दिट्ठे सुते सीलवते२(२ सी.-सीलब्बते.) मुते वा।
पुञ्ञे च पापे च अनूपलित्तो३(३ सी., म.-अनु.)। अत्तंदहो४(४ सी.-अत्तजहो.) न यिध५ पकुब्बमानो।।३।।(५ म., Fsb-इध.)

७९१ पुरिमं पहाय अपरं सितासे६(६ म.सिताय.)। एजानुगा ते७ नं७(७-७ म.न ते.) तरन्ति संगं।
ते उग्गहायति निरस्सजन्ति८(८ म.-निस्सजन्ति, निस्सज्जन्ति.)। कपीव साखं पमुखं९(९ सी.-पमुञ्च.) गहाय१०।।४।।( १० सी.-गहायं.)

मराठी अनुवादः-


७८९. अशा सांप्रदायिक दृष्टीनें जर माणसाची शुद्धि होऊं लागली, अथवा केवळ ज्ञानानें जर तो दु:खाचा त्याग करूं लागला, तर मग तो सोपाधिक माणूस भलत्याच उपायानें शुद्ध होतो असें म्हटलें पाहिजे. आणि हें तसें बोलणार्‍याची ती दृष्टीच (तो मिथ्यादृष्टी आहे असें) दाखवून देते.(२)

७९० पण दृष्ट, श्रुत, शीलव्रत, अनुमित, पुण्य अथवा पाप यांत उपलिप्त न होणारा, कोणच्याही सांप्रदायिक दृष्टीचा१(१ टीकाकार येथें ‘आत्मदृष्टी’चा ही उल्लेख करतो.) स्वीकार न करणारा, व जगांत (आसक्तिमय) कर्में न करणारा ब्राह्मण अशा भलत्याच उपायानें शुद्धि होते असें म्हणत नाहीं.(३)

७९१ (भलत्या उपायानें शुद्धि मानणारे), तृष्णेच्या मागें लागलेले, ते जुनी दृष्टी सोडून नवी पकडतात, व संग तरून जात नाहींत. वानर जसा समोरची फांदी पकडण्यासाठीं हातची सोडतो, त्याप्रमाणें ते (नवी दृष्टी) पकडतात व (जुनी) सोडतात.(४)
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel