पाली भाषेतः-

६०० तेसं वोऽहं व्यक्खिस्सं१(१ सी.-व्याक्खिस्सं, म.-अहं ब्यक्खिस्सं.) (वासेट्ठा ति भगवा) अनुपुब्बं यथातथं।
जातिविभंगं पाणानं अञ्ञमञ्ञा हि जातियो।।७।।

६०१ तिणरुक्खेऽपि जानाथ न चापि पटिजानरे।
लिंगं जातिमयं तेसं अञ्ञमञ्ञा हि जातियो।।८।।

६०२ ततो कीटे पतङ्गे च याव कुन्थकिपिल्लिके।
लिंगं जातिमयं तेसं अञ्ञमञ्ञा हि जातियो।।९।।

मराठीत अनुवाद :-

६००. त्या तुम्हांला-हे वासेष्ठा, असें भगवान् म्हणाला—मी अनुक्रमें यथार्थतया प्राण्यांचा जातिविभाग (निरनिराळे प्रकार) समजावून देतों. कारण (प्राणी-) जाती भिन्न भिन्न आहेत.(७)

६०१. तुम्ही गवत आणि झाडें पहा. जरी तीं आपण भिन्न आहोंत असें म्हणत नाहींत, तरी त्यांचा १जातिविशिष्ट (१ टीकेच्या अभिप्रायानुसार हा अर्थ दिला आहे. पण पुढील अर्थ ही शक्य आहे—त्यांचीं वैशिष्ट्ये ‘जातिमय’ म्हणजे जन्मत: सिद्ध अशीं आहेत. कारण ह्या प्राणि-जाती एकमेकांपासून भिन्नच आहेत. टीकाकार देखील हा अर्थ एके ठिकाणीं (६११ व्या गाथेवरील टीकेंत) सुचवितो असें दिसतें-(एतं तिरच्छानानं विय योनिसिद्धमेव केसादिसण्ठाननानत्तं मनुस्सेसु ब्राह्मणादीनं अत्तनो अत्तनो सरीरेसु न विज्जति.) आकार आहे. कारण त्यांच्यांत भिन्न भिन्न जाती आहेत.(८)

६०२. त्यानंतर किडे, पतंग आणि कुंथ-मुंग्या पर्यंतचे (लहान जीव) पहा. त्यांचा जातिविशिष्ट आकार आहे. कारण त्यांच्यांत भिन्न भिन्न जाती आहेत.(९)

पाली भाषेतः-

६०३ चतुप्पदेऽपि जानाथ खुद्दके च महल्लके।
लिंगं जातिमयं तेसं अञ्ञमञ्ञा हि जातियो।।१०।।

६०४ पादूदरेऽपि जानाथ उरगे दीघपिट्ठिके।
लिंगं जातिमयं तेसं अञ्ञमञ्ञा हि जातियो।।११।।

६०५ ततो मच्छेऽपि जानाथ उदके१(१ रो.-ओदके.) वारि-गोचरे।
लिंगं जातिमयं तेसं अञ्ञमञ्ञा हि जातियो।।१२।।

६०६ ततो पक्खीऽपि२(२-२ रो.-पक्खी विजानाथ.) जानाथ पत्तयाने विहंगमे।
लिंगं जातिमयं तेसं अञ्ञमञ्ञा हि जातियो।।१३।।

६०७ ततो एतासु जातीसु लिंगं जातिमयं पुथु।
एवं नत्थि मनुस्सेसु लिंगं जातिमयं पुथु।।१४।।

मराठी अनुवादः-

६०३. लहान आणि मोठे चतुष्पदही पहा. त्यांचा जातिविशिष्ट आकार आहे. कारण त्यांच्यात भिन्न भिन्न जाती आहेत.(१०)

६०४. पोटानें सरपटणारे लांब पाठीचे सर्पही पहा. त्यांचा जातिविशिष्ट आकार आहे. कारण त्यांच्यात भिन्न भिन्न जाती आहेत.(११)

६०५. तदनंतर पाण्यांत वास करणारे जलचर मासेही पहा. त्यांचा जातिविशिष्ट आकार आहे. कारण त्यांच्यात भिन्न भिन्न जाती आहेत.(१२)

६०६. त्यानंतर पंखांनी उडणारे आकाशमार्गी पक्षीही पहा. त्यांचा जातिविशिष्ट आकार आहे. कारण त्यांच्यात भिन्न भिन्न जाती आहेत.(१३)

६०७. जसा या प्राणी-जातींत जातिविशिष्ट भिन्न भिन्न आकार सांपडतो, तसा मनुष्यांत जातिविशिष्ट भिन्न भिन्न आकार सांपडत नाहीं.(१४)
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel