पाली भाषेत :-

२७१ रागो च दासो च इतो निदाना। अरती रती लोमहंसो इतोजा।
इतो समुट्ठाय मनोवितक्का। कुमारका धंकमिवोस्सजन्ति।।२।।

२७२ स्नेहजा अत्तसंभूता निग्रोधस्सेव खन्धजा।
पुथु विसत्ता कामेसु मालुवा वितता वने।।३।।

२७३ ये नं पजानन्ति यतो निदानं। ते नं विनोदेन्ति सुणोहि यक्ख।
ते दुत्तरं ओधमिमं तरन्ति। अतिण्णपुब्बं अपुनब्भवाया ति।।४।।

सूचिलोमसुत्तं निट्ठितं।

मराठीत अनुवाद :-

२७१. काम आणि क्रोध येथून होतात, अरति आणि रति आणि रोमहर्ष येथून होतात. हे वितर्क येथून उत्पन्न होऊन, द्वाड मुलें कावळ्याला (दोरीला बांधून) उडवितात, तसें मनाला उडवितात. (२)

२७२. ते स्नेहापासून होतात, वडाच्या पारंब्याप्रमाणें आपल्याच अन्त:करणांत उत्पन्न होऊन मालुवा१-लतेप्रमाणें (१ मालुवा-लता हिमालयाच्या अरण्यांत होते. ती ज्या वृक्षावर चढते त्यावर पसरून त्याचा समूळ नाश करते.) उपभोग्य वस्तूंमध्ये पसरतात. (३)

२७३. हें यक्षा, माझें ऐक. येथून हे (वितर्क) उत्पन्न होतात, हें जे जाणतात ते त्यांचा त्याग करतात व हा दुस्तर अतीर्ण पूर्व ओघ तरून पुनर्जन्म घेत नाहींत. (४)

सूचिलोमसुत्त समाप्त


पाली भाषेत :-

१८
[६. धम्मचरियसुत्तं]


२७४ धम्मचरियं ब्रह्मचरियं एतदाहु वसुत्तमं।
पब्बजितोऽपि चे होति अगारस्माऽनगारियं१( १ म - अगाराऽनगारियं.)।।१।।

२७५ सो चे मुखरजातिको विहेसाऽभिरतो मगो।
जीवितं तस्स पापियो रजं वड्ढेति अत्तनो।।२।।

२७६ कलहाभिरतो भिक्खु मोहधम्मेन आवटो२( म. आवुतो.)
अक्खतंऽपि न जानाति धम्मं बुद्धेन देसितं।।३।।

२७७ विहेसं भावितऽत्तानं अविज्जाय पुरक्खतो।
संकिलेसं न जानाति मग्गं निरयगामिनं।।४।।

मराठीत अनुवाद :-


१८
[६. धम्मचरियसुत्त]


२७४. धर्मचर्या आणि ब्रह्मचर्य हें उत्तम धन होय. गृहत्याग करून अनागरिक परिव्राजक झाला तरी, (१)

२७५. तो जर वाचाळ, इतरांना त्रास देण्यांत सुख मानणारा, व जनावरासारखा वागणारा असला, तर त्याचें जीवन हीन होय; तो स्वत:चा मळ वाढवितो. (२)

२७६. कलहाभिरत व मोहानें परिवेष्टित असा भिक्षु, बुद्धानें उपदेशिलेल्या धर्माचें स्पष्टीकरण केलें असतांही, तें जाणत नाहीं. (३)

२७७. भावितात्म्याला (अरहन्ताला) त्रास देणारा, अविद्येनें पछाडलेला (भिक्षु) हा नरकगामी संक्लिष्ट मार्ग आहे हें जाणत नाहीं. (४)
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel