पाली भाषेतः-

५३८. यानि च तीणि यानि च सट्ठि। समणप्पवादसितानि१(१म.-निस्सितानि.) भूरिपञ्ञ।
सञ्ञक्खर२सञ्ञनिस्सितानि।(२म.-पञ्चक्खर.) ओसरणानि विनेय्य ओघतम३गा।।२९।। (३ अ. (ब्याकरण)-ओघतममगा। ओघन्तमगा ति वा पाठो।)

५३९ अन्तगूऽसि पारगूऽसि दुक्खस्स। अरहाऽसि सम्मासंबुद्धो खीणासवं तं मञ्ञे।
जुतिमा मुतिमा पहूतपञ्ञो। दुक्खस्सऽन्तकर अता४रयि मं।।३०।।(४-सी.-अतारेसि.)

५४० यं मे कंखितमञ्ञासि। विचिकिच्छं५ मं अतारेसि नमो ते। (५-म.,सी-विचिकिच्छा.)
मुनि मोनपथेसु पत्तिपत्त६। अखिल आदिच्चबन्धु सोरतोऽसि।।३१।। (६-म.-पत्तिपत्तं.)

मराठी अनुवादः-

५३८. हे विपुलप्रज्ञ, हीं साठ आणि तीन१,(१. दीघनिकायांतील ब्रह्मजालसुत्तांत विवरण केलेलीं बासष्ट व सत्काय दृष्टि (आत्मवाद) मिळून त्रेसष्ट.) श्रमणवादावर व केवळ कल्पनामय शब्दांवरच अवलंबून राहणारीं व ज्यांचा आसरा अनेक श्रमणांनी घेतलेला आहे, अशीं मतें (उतार) सोडून तूं ओघ तरून गेलास!(२९)

५३९. तूं दु:खाच्या अन्ताला गेलास, तूं दु:खाच्या पार गेलास. तूं अर्हन् सम्यक्-संबुद्ध आहेस. तुला मी क्षीणाश्रव समजतों. तू द्युतिमान्, मतिमान् आणि विपुलप्रज्ञ आहेस. हे दु:खान्तकर, तू मला तारलेंस!(३०)

५४०. तूं माझ्या शंका जाणल्यास व संशयबद्ध अशा मला तारलेंस. तुला मी नमस्कार करतों. हे मौनमार्गात पूर्णत्व पावलेल्या मुने, हे काठिण्यरहित आदित्यबन्धो, तूं खरोखर शान्त आहेस.(३१)

पाली भाषेतः-


५४१ या मे कंखा पुरे आसि तं मे व्याकासि चक्खुमा।
अद्धा मुनीऽसि संबुद्धो नत्थि नीवरणा तव।।३२।।

५४२ उपायासा च ते सब्बे विद्धस्ता विनलीकता।
सीतिभूतो दमपत्तो घितिमा सञ्चनिक्कमो।।३३।।

५४३ तस्स ते नागनागस्स महावीरस्स भासतो।
सब्बे देवाऽनुमोदन्ति उभो नारदपब्बता।।३४।।

५४४ नमो ते पुरिसाजञ्ञ नमो ते पुरिसुत्तम।
सदेवकस्मिं लोकस्मिं नत्थि ते पटिपुग्गलो।।३५।।

मराठी अनुवादः-


५४१. जी मला पूर्वी शंका होती, तिचें चक्षुष्मन्तानें समाधान केलें. खात्रीनें तूं संबुद्ध मुनि आहेस. कारण तुला आवरणें१(१.कामच्छंद, व्यापाद, अनुत्साह व आळस, भ्रान्तचित्तता, व कुशंका हीं पांच आवरणें.) नाहींत.(३२)

५४२. तुझें सर्व शोक विध्वस्त झाले आहेत, विनाश पावले आहेत. तूं शान्तिमय, दमप्राप्त, धृतिमान् आणि सत्यनिष्कम आहेस!(३३)

५४३. त्या तुझें नागनागाचें महावीराचें भाषण नारद आणि पर्वत२(२.महाभारतांत शान्तिपर्वांत ह्या दोन ऋषींची माहिती दिली आहे. (भाण्डारकर प्राच्य संशोधन मन्दिर प्रत, १२.३० पहा.) हे दोघे व सकल देव अनुमोदितात.(३४)

५४४. हे पुरुषाजन्या, तुला नमस्कार असो. हे पुरुषोत्तमा, तुला नमस्कार असो. या सदेवक लोकांत तुझ्यासारखा दुसरा पुरुष नाहीं.(३५)
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel