पाली भाषेत :-

४७३ संगातिगो यस्स न सन्ति संगा। यो मान-सत्तेसु अ-मान सत्तो।
दुक्खं परिञ्ञाय सखेत्तवत्थुं। तथागतो अरहति पूरळासं।।१९।।

४७४ आसं अनिस्साय विवेकदस्सी। परवेदियं दिट्ठिमुपातिवत्तो।
आरम्मणा यस्स न सन्ति केचि। तथागतो अरहति पूरळासं।।२०।।

४७५ परोवरा यस्स समेच्च धम्मा। विधूपिता अत्थगता न सन्ति।
सन्तो उपादानखये विमुत्तो। तथागतो अरहति पूरळासं।।२१।।

४७६ संयोजनं जातिखयऽन्तदस्सी। योऽपानुदि रागपथं असेसं।
सुद्धो निद्दोसो विमलो अकाचो१(१सी.-अकामो.)। तथागतो अरहति पूरळासं।।२२।।

मराठीत अनुवाद :-

४७३. संगाच्या पार गेल्यानें ज्याला संग नाहींत, जो अहंकारबद्ध लोकांत अहंकारापासून मोकळा, दु:खाच्या क्षेत्रवस्तूंसह (कारण-परंपरेसह) दु:खाला जाणतो, तो तथागत पुरोडाश देण्याला योग्य होय.(१९)

४७४. आशेंत बद्ध न होतां जो विवेकदर्शी, इतर सांप्रदायिक दृष्टीच्या पलीकडे गेलेला, व ज्याला कोणत्याही (पुनर्भवाच्या कारण बनलेल्या) वासना नाहींत, तो तथागत पुरोडाश देण्याला योग्य होय.(२०)

४७५. लहानमोठे संस्कार जाणून ज्यानें दग्ध केले, ज्याला ते राहिले नाहींत, जो शान्त व तृष्णेच्या क्षयानें विमुक्त, तो तथागत पुरोडाश देण्याला योग्य होय.(२१)

४७६. ज्यानें संयोजनांच्या (क्षयामुळे१) (१ टीकेला अनुसरून हा अर्थ दिलेला आहे.) जन्माचा अन्त पाहिला आणि अशेष कामपथाचा त्याग केला, जो शुद्ध, निर्दोष, विमल व अपाप, तो तथागत पुरोडाश देण्याला योग्य होय.(२२)

पाली भाषेत :-

४७७ यो अत्तनाऽत्तानं नानुपस्सति। समाहितो उज्जुगतो ठितऽत्तो।
स वे अनेजो अखिलो अकखो। तथागतो अरहति पूरळासं।।२३।।

४७८ मोहऽन्तरा यस्स न सन्ति केचि। सब्बेसु धम्मेसु च ञाणदस्सी
सरीरं च अन्तिमं धारेति। पत्तो च सम्बोधिमनुत्तरं सिवं।
एत्तावता यक्खस्स सुद्धि। तथागतो अरहति पूरळासं।।२४।।

४७९ हुतं च मय्हं हुतमत्थु सच्चं। यं तादिसं वेदगुनं अलत्थं।
ब्रह्मा हि सक्खि पटिगण्हातु मे भगवा। भुञ्जतु मे भगवा पूरळासं।।२५।।

४८० गाथाऽभिगीतं मे अभोजनेय्यं। संपस्सतं ब्राह्मण नेस धम्मो।
गाथाऽभिगीतं पनुदन्ति बुद्धा। धम्मे सति ब्राह्मण वुत्तिरेसा।।२६।।

मराठीत अनुवाद :-

४७७. जो स्वत: (आपलें ठायीं अन्तर्यामी असा) आत्मा पाहत नाहीं, जो समाहित, सरळ व स्थितात्मा, तो अप्रकम्प्य, काठिन्यरहित, नि:शंक तथागत पुरोडाश देण्याला योग्य होय.(२३)

४७८. ज्याच्या अन्त:करणांतून अज्ञानहेतू नष्ट झाले, जो सर्व पदार्थांकडे ज्ञानदृष्टीनें पाहतो, जो अन्तिम शरीर धारण करतो, जो कल्याणकारक लोकोत्तर संबोधाला पावला, व येणेंकरून ज्याची आत्मशुद्धि झाली, तो तथागत पुरोडाश देण्याला योग्य होय.(२४)

४७९. (ब्राह्मण-) आज मला तुझ्यासारखा वेदपारग मिळाला, तेव्हां हें माझें हव्य यथार्थ हव्य होऊं दे. साक्षात् ब्रह्मा असा भगवान् हें माझें (हव्यशेष-अन्न) ग्रहण करो. भगवान् या पुरोडाशाचें भोजन करो. (२५)

४८०. (भगवान्-) या अन्नासंबंधीं मी गाथा बोललों तेव्हा तें मला स्वीकारतां येत नाहीं. हे ब्राह्मणा, (तें स्वीकारणें) हा जाणत्याचा धर्म नव्हे. ज्या अन्नासंबंधी गाथा म्हटल्या तें अन्न बुद्ध स्वीकारीत नाहींत. हे ब्राह्मणा, सदाचाराला हीच पद्धत योग्य आहे. (२६)
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel