पाली भाषेत :-

५२
[१४. तुवट्ठकसुत्तं]


९१५ पुच्छामि तं आदिच्चबन्धुं। विवेकं सन्तिपदं च १महेसिं। (१ नि.-महेसि.)
कथं दिस्वा निब्बाति भिक्खु। अनुपादियानो लोकस्मिं किंचि।।१।।

९१६ मूलं पपञ्चसंखाया (ति भगवा)। मन्ता अस्मीति सब्बमुपरुन्धे२। (२ म. रुद्धे.)
या काचि तण्हा अज्झत्तं। तासं विनया सदा सतो सिक्खे।।२।।

९१७ यं किंचि धम्ममभिजञ्ञा। अज्झत्तं अथ वाऽपि बहिद्धा।
न तेन थामं३ कुब्बेथ। न हि सा निब्बुति सतं वुत्ता।।३।। (३म.-मानं.)

मराठीत अनुवाद :-

५२
[१४. तुवट्ठकसुत्त]


९१५ “विविक्त शान्तिपद कोणतें तें मी आदित्यबन्धु महर्षीला विचारतों. या जगांत कशाचेंहि उपादान न करतां भिक्षु काय पाहून निर्वाण पावतो?” (१)

९१६ प्रपंचाचें मूळ अहंकार—असें भगवान् म्हणाला—त्याचा प्रज्ञेनें समूळ निरोध करावा, आणि सदोदित स्मृतिमान् राहून ज्या कांहीं अन्त:करणांत तृष्णा असतील, त्याचा नाश करण्यास शिकावें. (२)

९१७ ज्या कांहीं आध्यात्मिक किंवा बाह्य गोष्टींचें ज्ञान मिळेल त्यायोगें अहंकार करूं नये. कारण तें सज्जनांचें निर्वाण नव्हे.( ३)

पाली भाषेत :-


९१८ सेय्यो न तेन मञ्ञेय्य। नीचेय्यो अथ वाऽपि सरिक्खो।
फुट्ठो१ अनेकरूपहि। नातुमानं विकप्पयं तिट्ठे।।४।। (१ सी.-पुट्ठो.)

९१९ अज्झत्तमेव उपसमे। नाञ्ञतो भिक्खु सन्तिमेसेय्य।
अज्झत्तं उपसन्तस्स। नत्थि अत्तं२ कुतो निरत्तं३ वा।।५।। (२ नि.-अत्ता.) (३ नि.-निरत्ता.)

९२० मज्झे यथा समुद्दस्स। ऊमि नो जायति ठितो होति।
एवं ठितो अनेजस्स। उस्सदं भिक्खु न करेय्य कुहिं चि।।६।।

९२१ अकित्तयि विवटचक्खु । सक्खिधम्मं परिस्सयविनयं।
पटिपदं वदेहि भद्दं ते । पातिमोक्खं अथ वाऽपि समाधिं।।७।।

मराठीत अनुवाद :-

९१८ त्या ज्ञानानें आपणांस इतरांहून श्रेष्ठ, हीन किंवा त्यांच्या समान समजूं नये. अनेक गोष्टींशीं संबंध आला असतां त्यांत अहंतेची कल्पनाहि येऊं देऊं नये. (४)

९१९ भिक्षूनें आपल्याच अन्तःकरणांत शान्ति मिळवावी, व बाह्य पदार्थांपासून शान्ति मिळविण्याचें पाहूं नये. जो आपल्या अन्तःकरणांत शान्त होतो, त्याला स्वीकृत असे कांहींच नाहीं मग धिक्-कृत१ (१ गाथा ७८७ वरील टीप पहा.) कोठून असणार? (५)

९२० समुद्राच्या बुडाशीं जशी लाट उठत नाहीं, आणि त्यामुळें स्थिर राहतां येतें, त्याप्रमाणें भिक्षूनें स्थिर आणि अप्रकम्प्य व्हावें, आणि कसलाहि उत्सद करूं नये. (६)

९२१ (त्वां) विवृतचक्षूनें (बुद्धानें) विघ्नविनाशक प्रत्यक्ष-फलद असा धर्म मला समजावून सांगितला. - त्या तुझें कल्याण होवो - आतां मला त्या धर्माचा मार्ग - म्हणजे प्रातिमोक्ष किंवा समाधि—सांग. (७)
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel