पाली भाषेत :-

२३
[११. राहुलसुत्तं]


३३५. कच्चि अभिण्हसंवासा नावजानासि पण्डितं |
उक्काधारो मनुस्सानं कच्चि अपचितो तया ||१||

३३६.  नाहं अभिण्हसंवासा अवजानामि पण्डितं |
उक्काधारो मनुस्सानं निच्चं अपचितो मया ||२||
वत्थुगाथा१ (१ म.  (न दिस्सति). |

३३७. पंचकामगुणे हित्वा पियरूपे मनोरमे |
सद्धाय घरा निक्खम्म दुक्खस्सऽन्तकरो भव ||३||

मराठीत अनुवाद :-

२३
[११. राहुलसुत्त]


३३५. (भगवान् - ) अतिपरिचयामुळें तूं त्या सुज्ञाची (शारिपुत्राची) अवज्ञा करीत नाहींस ना  ? मनुष्यासाठीं ज्ञानाची मशाल पाजळणार्‍या त्याचा तूं  आदर ठेवतोस ना?  (१)

३३६. (राहुल-) अतिपरिचयामुळें त्या सुज्ञाची मी अवज्ञा करीत नाहीं. मनुष्यासाठी ज्ञानाची मशाल पाजळणार्‍या  त्याचा मी सतत आदर ठेवतों. ( (२)

[(वरील ) गाथा प्रास्ताविक आहेत.]

३३७. मनाला आवडणारे व उल्लसित करणारे पंचेन्द्रियांचे विषय सोडून श्रद्धापूर्वक घरांतून नीघ व दु:खाचा अन्त कर .( ३)

पाली भाषेत :-

३३८. मित्ते भजस्सु कल्याणे प१न्तं(१ सी.- पत्थं, म. –पन्थं.) च सयनासनं |
विवित्तं अप्पनिग्घोसं मत्तञ्ञू होहि भोजने ||४||

३३९. चीवरे पिण्डिपाते च पच्चये सयनासने |
एतेसु तण्ह माऽकासि मा लोकं पुनरागमि ||५||

३४०. संवुतो पातिमोक्खस्मि इन्द्रियेसु च पंचसु |
सति कायगता त्यत्थु निब्बिदाबहुलो भव ||६||

३४१. निमित्तं परिवज्जेहि सुभं रागूपसंहितं |
असुभाय चित्तं भावेंहि एकग्गं सुसमाहितं ||७||

मराठीत अनुवाद :-

३३८. कल्याणमित्रांची संगति धर. तुझी बसण्या-उठण्याची जागा जेथें गडबड कमी अशा एकान्त स्थळीं असूं दे व तूं भोजनाचें बाबतींत मिताहारी हो.  (४)

३३९. चीवर    (भिक्षुवस्त्र) अन्न,  आजारांत  उपयोगी पडणारें औषध, आणि आश्रयस्थान यांच्यांत आसक्ति धरूं नकोस; इहलोकीं पुनर्जन्म घेऊं नकोस.  (५)

३४०. प्रतिमोक्षाच्या नियमांप्रमाणें संवृत राहून पञ्चेन्द्रियांत संयम ठेव, कायगतास्मृतीची भावना कर व वैराग्याकडे ओढा ठेव. (६)

३४१. कामविकार उत्पन्न होईल, असें शुभनिम्मित्त वर्ज्य कर, व जेणेंकरून चित्त एकाग्र व समाधियुक्त होईल अशा (शरिराच्या) अशुभभावाचें चिन्तन कर. (७)
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel