पाली भाषेत :-
२६
[१४. धम्मिकसुत्तं]


एवं मे सुतं। एकं समयं भगवा सावत्थियं विहरति जेतवने अनाथपिण्डिकस्स आरामे। अथ खो धम्मिको उपासको पंचहि उपासकसतेहि सद्धिं येन भगवा तेनुपसंकमि. उपसंकमित्वा भगवन्तं अभिवादेत्वा एकमन्तं निसीदि। एकमन्तं निसिन्नो खो धम्मिको उपासको भगवन्तं गाथाहि अज्झभासि—

३७६ पुच्छामि तं गोतम भूरिपञ्ञ। कथंकरो सावको साधु होति।
यो वा अगारा अनगारमेति। अगारिनो वा पनुपासकासे।।१।।

३७७ तुवं हि लोकस्स सदेवकस्स। गतिं पजानासि परायणं च।
न चऽत्थि तुल्यो निपुणत्थदस्सी। तुवं हि बुद्धं पवरं वदन्ति।।२।।


मराठीत अनुवाद :-
२६
[१४. धम्मिकसुत्त]


असें मी ऐकलें आहे. एके समयीं भगवान् श्रावस्ती येथें जेतवनांत अनाथपिण्डिकाच्या आरामांत राहत होता. तेव्हां धम्मिक उपासक पांचशे उपासकांना बरोबर घेऊन भगवन्तापाशीं आला. येऊन भगवन्ताला नमस्कार करून एका बाजूस बसला. एका बाजूस बसून धम्मिक उपासक भगवन्ताला गाथींनीं म्हणाला—

३७६. हे विपुलप्रज्ञ गोतमा, तुला मी विचारतों कीं, गृहत्याग करून अनागारिक बनलेला आणि गृहस्थाश्रमांत राहणारा उपासक, या श्रावकांपैकी कोणता श्रावक चांगला? (१)

३७७. कारण तूं देवांसह सर्व जगाची गति आणि कर्मफळ२ ( २ अ.-परायणं ति निप्फत्ति) जाणतोस. तुझ्यासारखा सूक्ष्मार्थदर्शी दुसरा नाहीं, आणि म्हणूनच तुला बुद्धश्रेष्ठ म्हणतात. (२)
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel