पाली भाषेत :-

१७१ पंच कामगुणा लोके मनोछट्ठा पवेदिता१ (१ सी.-पमोदिता.)
एत्थ छन्दं विराजेत्वा एवं दुक्खा पमुच्चति।।१९।।

१७२ एतं लोकस्स निय्यानं अक्खातं वो यथातथं।
एतं वो अहमक्खामि एवं दुक्खा पमुच्चति।।२०।।

१७३ को सूध तरति ओघं कोध तरति अण्णवं।
अप्पतिट्ठे अनालम्बे को गंभीरे न सीदति।।२१।।

१७४ सब्बदा सीलसंपन्नो पञ्ञवा सुसमाहितो।
अज्झत्तचिन्ती२ (२ म.-अज्झत्तसञ्ञी.) सतिमा ओघं तरति दुत्तरं।।२२।।

१७५ विरतो३ (३ म.-‘विरत्तो’ ति पि.) कामसञ्ञाय सब्बसंयोजनातिगो।
नन्दीभवपरिक्खीणो सो गंभीरे न सीदति।।२३।।

मराठीत अनुवाद :-

१७१. (भगवान्-) इहलोकीं पंचेन्द्रियांचे आणि मनाचे असे जे विषय सांगितले गेले आहेत, त्यांत आसक्ति सोडून दिली म्हणजे दु:खापासून मुक्त होतो. (१९)

१७२. लोकापासून सुटण्याचा हा यथार्थ मार्ग सांगितला आहे; आणि हाच मी तुम्हांस सांगतों; यानेंच दु:खापासून मुक्त होतो. (२०)

१७३. (हेमवत-) इहलोकीं ओघ कोण तरतो? सागर कोण तरतो? ज्यांत ठाव नाहीं व पकडण्याला कांहीं नाहीं अशा या गंभीर सागरांत कोण बुडत नाहीं? (२१)

१७४. (भगवान्-) सदोदित शीलसंपन्न, प्रज्ञावान्, समाधिसंपन्न, अध्यात्मचिंतन करणारा व स्मृतिमान् (म्हणजे जागृत) असा मनुष्य दुस्तर ओघ तरून जातो. (२२)

१७५. विषयांच्या कल्पनेपासून उपरत, सर्व संयोजनांच्या पलीकडे गेलेला व ज्याची तृष्णा आणि भवबन्धनें क्षीण झालीं आहेत, असा मनुष्य या गंभीर सागरांत बुडत नाहीं. (२३)

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel