पाली भाषेत :-

१०४१ कामेसु ब्रह्मचरियवा (मेत्तेय्या ति भगवा) वीततण्हो सदा सतो।
संखाय निब्बुतो भिक्खु तस्स नो सन्ति इञ्जिता।।२।।

१०४२ सो उभन्तमभिञ्ञाय मज्झे मन्ता न लिप्पति।
तं ब्रूमि महापुरिसो ति सो इध सिब्बनिमच्चगा ति।।३।।

तिस्समेत्तेय्यमाणवपुच्छा निट्ठिता।

मराठीत अनुवाद :-

१०४१ कामोपभोगांचा त्याग करून, ब्रह्मचारी राहून - हे मेत्तेय्य, असें भगवान् म्हणाला - जो वीततृष्ण आणि सदोदित स्मृतिमान् होतो, तो भिक्षु प्रज्ञेच्या योगें शांत (सन्तुष्ट) होतो, त्याला प्रकंप नाहींत. (२)

१०४२. तो दोन्ही अन्त जाणून प्रज्ञेमुळें मध्याला चिकटून राहत नाहीं, त्यालाच मी महापुरुष म्हणतों; आणि या जगांत तोच तृष्णेच्या पार जातो. (३)

तिस्समेत्तेय्यमाणवपुच्छा समाप्त

५८
[४. पुण्णकमाणवपुच्छा (३)]

पाली भाषेत :-


१०४३ १(१ म.-अनेज.) अनेजं मूलदस्साविं (इच्चायस्मा पुण्णको) अत्थि पञ्हेन२(२-३ म. - पञ्हेनमागमं.) आगमं३(३म.-आगमि, आगमिं )
किं-निस्सिता इसयो४(४ Fsb. [इसियो मनुजा]...[पुथु इध लोके] ) मनुजा खत्तिया ब्राह्मणा५ (५ Fsb.-ब्राह्मणा च.)देवतानं यञ्ञमकप्पयिंसु६(६म.-मकप्पिंसु ) पुथू इध लोके। 
पुच्छामि तं भगवा ब्रूहि मे तं।।१।।


१०४४ ये केचि मे इसयो मनुजा (पुण्णका ति भगवा) खत्तिया ब्राह्मणा देवतानं यञ्ञमकप्पयिंसु पुथू इथलोके।
आसिसमाना पुण्णक इत्थभावं७(७म.-इत्थत्तं.)। जरं सिता यञ्ञमकप्पयिंसु।।२।।

५८
[४. पुण्णकमाणवपुच्छा (३)]

मराठीत अनुवाद :-


१०४३ अप्रकम्प्य आणि संसाराचें मूळ जाणणारा, अशापाशीं — असें आयुष्मान् पुण्णक म्हणाला — प्रश्न विचारण्याच्या हेतूनें आलों आहें. कशानें बद्ध झालेले ऋषि, क्षत्रिय, ब्राह्मण किंवा इतर माणसें देवतांना उद्देशून या जगांत भिन्न भिन्न यज्ञ करतात, तें मी विचारतों. हे भगवन्, तें मला सांग.(१)

१०४४.जे कोणी ऋषि — हे पुण्णका, असें भगवान् म्हणाला — क्षत्रिय, ब्राह्मण किंवा इतर माणसें देवतांना उद्देशून या जगांत भिन्न भिन्न यज्ञ करतात ते, हे पुण्णका, इहलोकीं पुनर्जन्माची अपेक्षा करतात व जरेनें बद्ध होत्साते यज्ञ करतात. (२)
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel