पाली भाषेत :-

१६० कच्चि न रज्जति कामेसु (इति हेमवतो यक्खो) कच्चि चित्तं अनाविलं।
कच्चि मोहं अतिक्कन्तो कच्चि धम्मेसु चक्खुमा।।८।।

१६१ न सो रज्जति कामेसु (इति सातागिरो यक्खो) अथो चित्तं अनाविलं।
सब्बं मोहं अतिक्कन्तो बुद्धो धम्मेसु चक्खुमा।।९।।

१६२ कच्चि विज्जाय संपन्नो (इति हेमवतो यक्खो) कच्चि संसुद्धचारणो।
कच्चिऽस्स आसवा खीणा कच्चि नत्थि पुनब्भवो।।१०।।

१६३ विज्जाय१ (१-१ रो.-विज्जायमेव.) चेव१ संपन्नो (इति सातागिरो यक्खो) अथो संसुद्धचारणो।
सब्बस्स आसवा खीणा नत्थि तस्स पुनब्भवो।।११।।

मराठीत अनुवाद :-

१६०. तो विषयांत आसक्त होत नाहीं ना?-असें हेमवत यक्ष म्हणाला-त्याचे चित्त शान्त आहे काय? तो मोहाच्या पार गेला आहे काय? पदार्थांचें स्वरूप जाणण्यांत तो डोळस आहे काय? (८)

१६१. तो विषयांत आसक्त नाहीं- सातागिर यक्ष म्हणाला- आणि त्याचें चित्त शान्त आहे; तो सर्व मोहाच्या पार गेला आहे; तो बुद्ध पदार्थांचें स्वरूप जाणण्यांत डोळस आहे. (९)

१६२. तो प्रज्ञासंपन्न आहे काय?-असें हेमवत यक्ष म्हणाला-आणि ह्याचें आचरण शुद्ध आहे काय? त्याचे आश्रव क्षीण झाले आहेत काय? त्याला पुनर्जन्म नाहीं ना? (१०)

१६३. तो प्रज्ञासम्पन्न आहे- सातागिर यक्ष म्हणाला- आणि त्याचें आचरण शुद्ध आहे; त्याचे सर्व आश्रव क्षीण झाले आहेत आणि त्याला पुनर्जन्म नाहीं.(११)

पाली भाषेत :-

१६३ (अ) संपन्नं मुनिनो चित्तं कम्मना व्यप्पथेन च।
विज्जाचरणसंपन्नं धम्मतो नं पसंससि।।११(अ)।।

१६३ (आ) संपन्नं मुनिनो चित्तं कम्मना व्यप्पथेन च।
विज्जाचरणसंपन्नं धम्मतो अनुमोदसि।।११(आ)।।

१६४ संपन्नं मुनिनो चित्तं कम्मना व्यप्पथेन च।
विज्जाचरणसंपन्नं हन्द पस्साम गोतमं।।१२।।

१६५ एणिजंघं किसं धीरं अप्पाहारं अलोलुपं।
मुनिं वनस्मिं झायन्तं एहि पस्साम गोतमं।।१३।।

१६६ सीहं वेकचरं नागं कामेसु अनपेक्खिनं।
उपसंकम्म पुच्छाम मच्चुपासा पमोचनं।।१४।।

मराठीत अनुवाद :-

१६३ (अ). (हेमवत-) त्या मुनीचें मन शारीरिक व वाचसिक सत्कर्मांनीं संपन्न आहे- विद्याचरणसंपन्न असलेल्याची तूं धर्माला अनुसरूनच प्रशंसा करतोस. (११ अ)

१६३ (आ). (सातागिर-) त्या मुनीचें मन शारीरिक व वाचसिक सत्कर्मांनीं संपन्न आहे. विद्याचरणसंपन्न असलेल्याचें तूं धर्मास अनुसरूनच प्रशंसा करतोस. (११ आ)

१६४. त्या मुनीचें मन शारीरिक सत्कर्मांनीं संपन्न आहे चल, आपण त्या विद्याचरणसंपन्न गोतमाला भेटूं. (१२)

१६५. (हेमवत-) मृगाच्या मांड्यांप्रमाणें ज्याच्या मांड्या आहेत. जो कृश, धैर्यवान्, मिताहारी, अलोलुप, वनांत (एकान्तांत) ध्यान करणारा, असा मुनि गोतम-चल त्याला आपण भेटूं. (१३)

१६६. सिंहाप्रमाणें एकाकी राहणार्‍या व कामसुखांत निरपेक्ष असलेल्या त्या नागाजवळ१ .[१ नाग म्हणजे हत्ती किंवा ज्याला पाप नाहीं तो; (न+आगस् यस्य स:)] जाऊन मृत्युपाशापासून मोक्ष कोणता विचारू. (१४)
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel