पाली भाषेत :-

३०५ निवेसनानि रम्मानि सुविभत्तानि भागसो।
नानाधञ्ञस्स पूरेत्वा ब्राह्मणानं अदा धनं।।२२।।

३०६ ते च तत्थ धनं लद्धा सन्निधिं समरोचयुं।
तेसं इच्छाऽवतिण्णानं भिय्यो तण्हा पवड्ढथ।
ते तत्थ मन्ते गन्थेत्वा ओक्काकं पुनमुपागमुं१(१ सी.-पुनुपागमं.)।।२३।।

३०७ यथा आपो च पठवी हिरञ्ञं धनधानियं।
एवं गावो मनुस्सानं परिक्खारो सो हि पाणिनं।
यजस्सु बहु ते वित्तं यजस्सु बहु ते धनं।।२४।।

३०८ ततो च राजा सञ्ञत्तो ब्राह्मणेहि रथेसभो।
नेकसतसहस्सियो२(२. रो.-नेका सतसहस्सियो; म.-अनेक सतसहस्सियो.) गावो अञ्ञे अघातयि।।२५।।

मराठीत अनुवाद :-

३०५. आणि नीट रीतीनें बांधलेली रम्य घरें, अनेक धान्यांनीं भरलीं व ही व (इतर) संपत्ति त्यानें ब्राह्मणांना दिली. (२२)

३०६. त्या यज्ञांत धनसंपत्ति मिळवून ब्राह्मण तिचा संचय करते झाले. अशा रीतीनें आशाळभूत झालेल्यांची तृष्णा आणखीही वाढली. त्यासाठीं पुनरपि मन्त्र रचून ते इक्ष्वाकूपाशीं गेले, (२३)

३०७. आणि म्हणाले, “जसें पाणी, जमीन, हिरण्य किंवा धनधान्य, तशाच गाई मनुष्यप्राण्यांच्या उपभोग्य वस्तू होत. तुजपाशीं पुष्कळ वित्त आहे, तूं यज्ञ कर, तुजपाशीं पुष्कळ धन आहे, यज्ञ कर!” (२४)

३०८. अशी त्या ब्राह्मणांनीं समजूत घातली; तेव्हां त्या रथर्षभ राजानें यज्ञांत अनेक लक्ष गाई मारल्या. (२५)

पाली भाषेत :-

३०९ न पादा न विसाणेन नास्सु हिंसन्ति केन चि।
गावो एळकसमाना सोरता कुंभदूहना।
ता विसाणे गहेत्वान राजा सत्थेन घातयि।।२६।।

३१० ततो च देवा पितरो इन्दो असुररक्खसा।
अधम्मो इति पक्कन्दुं यं सत्थं निपती गवे।।२७।।

३११ तयो रोगा पुरे आसुं इच्छा अनसनं जरा।
पसूनं च समारंभा अट्ठानवुतिमागमुं।।२८।।

३१२ एसो अधम्मो दण्डानं ओक्कन्तो पुराणो अहु।
अदूसिकायो हञ्ञन्ति धम्मा घंसेन्ति१(१ म., अ. (रो.)- ‘धसन्ति’, चवन्ति, परिहायन्ति.)
याजका।।२९।।

३१३ एवमेसो अणुधम्मो पोराणो विञ्ञुगरहितो।
यत्थ एदिसकं पस्सति याजकं गरहती जनो।।३०।।

मराठीत अनुवाद :-

३०९. पायानें, शिंगानें किंवा दुसर्‍या कोणत्याही अवयवानें त्या गाई हिंसा करीत नव्हत्या. ज्या मेंढरासारख्या शान्त असून घडाभर दूध देत, अशा त्या गाई शिंगाला धरून राजानें यज्ञांत मारल्या. (२६)

३१०. तेव्हा देव, पितर, इन्द्र, असुर आणि राक्षस, ‘गाईवर शस्त्र पडलें; दा मोठा अधर्म झाला’ असें म्हणून हाहाकार करूं लागले. (२७)

३११. त्यापूर्वी इच्छा, भूक आणि जरा हे तीनच रोग होते; पशुघाताला सुरवात झाल्यावर ते अट्ठ्याण्णव झाले. (२८)

३१२. दंडामध्यें हा एक जुना अधर्म उत्पन्न झाला, ज्यायोगें याजक निर्दोषी गाईंना मारतात व धर्मापासून च्युत होतात. (२९)

३१३. याप्रमाणें ही हीन पुरातन चाल सुज्ञांनी निन्दिली आहे, आणि म्हणूनच असला याजक दिसला असतां लोक त्याची निंदा करतात. (३०)
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel