पाली भाषेत :-
१०
[१०. आळवकसुत्तं]


एवं मे सुतं। एकं समयं भगवा आळवियं विहरति आळवकस्स यक्खस्स भवने। यथ खो आळवको यक्खो येन भगवा तेनुपसंकमि, उपसंकमित्वा भगवन्तं एतदवोच—निक्खम समणा ति। साधावुसो ति भगवा निक्खमि। पविस समणा ति। साधावुसो ति भगवा पाविसि। दुनियंऽपि खो आळवको यक्खो भगवन्तं एतदवोच-निक्खम समणा ति। साधावुसो ति भगवा निक्खमि। पविस समणा ति। साधावुसो ति भगवा पाविसि। ततियंऽपि खो आळवको यक्खो भगवन्तं एतदवोच- निक्खम समणा ति। साधावुसो ति भगवा निक्खमि। पविस समणा ति। साधावुसो ति भगवा पाविसि। चतुत्थंऽपि खो आळवको यक्खो भगवन्तं एतदवोच-निक्खम समणा ति। न ख्वाहं तं१ (१ अ.-तं ति हेतुवचनं.) आवुसोनिक्खमिस्सामि, यं ते करणीयं ते करोही ति। पञ्हं तं समण पुच्छिस्सामि, सचे मे न व्याकरिस्ससि२(२ अ.-ब्याकरिस्ससि.) चित्तं वा ते खिपिस्सामी, हदयं वा ते फालेस्सामि, पादेसु वा गहेत्वा पारगंगाय खिपिस्सामि ति। न ख्वाहं तं आवुसो पस्सामि सदेवके लोके समारके सब्रह्मके सस्समणब्राह्मणिया पजाय सदेवमनुस्साय यो मे चित्तं वा खिप्पेय, हदयं वा ते फालेय्य, पादेसु वा गहेत्वा पारगंगाय खिपेय्य, अपि च त्वं आवुसो पुच्छ यदाकंखसी ति। अथ खो आळवको यक्खो भगवन्तं गाथाय अज्झभासि-

मराठीत अनुवाद :-
१०
[१०. आळवकसुत्त]


असें मी ऐकलें आहे. एके समयीं भगवान् आळवी येथें आळवक यक्षाच्या मंदिरांत राहत होता. ह्या वेळीं आळवक यक्ष भगवन्तापाशीं आला, व भगवन्ताला म्हणाला, “श्रमणा, बाहेर नीघ.” “ठीक, आयुष्मन्,” असें म्हणून भगवान् बाहेर निघाला, “श्रमणा, आंत ये.” “ठीक, आयुष्मन्” असें म्हणून भगवान् आंत गेला. दुसर्‍यांदाही आळवक यक्ष भगवन्ताला म्हणाला, “श्रमणा, बाहेर नीघ.” “ठीक, आयुष्मन्,” असें म्हणून भगवान् बाहेर निघाला. “श्रमणा, आंत ये.” “ठीक, आयुष्मन्” असें म्हणून भगवान् आंत गेला. तिसर्‍यांदाही आळवक यक्ष भगवन्ताला म्हणाला, “श्रमणा, बाहेर नीघ.” “ठीक, आयुष्मन्,” असें म्हणून भगवान् बाहेर निघाला. “श्रमणा, आंत ये.” “ठीक, आयुष्मन्” असें म्हणून भगवान् आंत गेला. चौथ्यांदाही आळवक यक्ष भगवन्ताला म्हणाला, “श्रमणा, बाहेर नीघ.” “आयुष्मन्, मी आतां बाहेर निघणार नाहीं. तूं जें कांहीं करावयाचे असेल तें कर.” “हे श्रमणा, मी तुला प्रश्न विचारतो; त्याचें जर तूं बरोबर उत्तर दिलें नाहींस तर तुला मी वेड लावीन, किंवा तुझें हृदय फाडून टाकीन, अथवा तुझ्या पायाला धरून तुला गंगेच्या पार फेकीन.”
“आयुष्मन्, या सदेवक, समारक, सब्रह्मक लोकांत, श्रमण-ब्राह्मणांत अथवा देवमनुष्यांत असा कोणीही मला दिसत नाहीं कीं, जो मला वेड लावील, किंवा माझें हृदय फाडील, अथवा माझ्या पायाला धरून मला गंगेच्या पार फेकील तथापि आयुष्मन्, तुझ्या इच्छेप्रमाणें प्रश्न विचार.” तेव्हां आळवक यक्ष भगवन्ताला गाथेनें म्हणाला—
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel