पाली भाषेतः-

७०७ ऊनूदरो मिताहारो अप्पिच्छस्स अलोलुपो।
स वे इच्छाय निच्छातो अनिच्छो होति निब्बुतो।।२९।।

७०८ स पिण्डचारं चरित्वा वनन्तं अभिहारये।
उपट्ठितो रुक्खमूलस्मिं आसनूपगतो मुनि।।३०।।

७०९ स झानपसुतो धीरो वनन्ते रमितो सिया।
झायेथ रुक्खमूलस्मिं अत्तानं अभितोसयं।।३१।।

७१० ततो रत्त्या विवसने गामन्तं अभिहारये।
अव्हानं नाभिनन्देय्य अभिहारं च गामतो।।३२।।

७११ न मुनी१(१ म.-मुनी.) गाममागम्म कुलेसु सहसा चरे।
घासेसनं छिन्नकथो न वाचं पयुतं भणे।।३३।।

मराठी अनुवादः-

७०७ त्यानें थोडें खाणारा, मिताहारी, अल्पेच्छ व अलोलुप व्हावें. तो इच्छेपासून मुक्त होऊन अनिच्छ व शांत होतो. (२९)

७०८ त्या मुनीनें भिक्षाटन करून अरण्यांत जावें. तेथें झाडाखालीं जाऊन आसनावर बसावें. (३०)

७०९ त्या ध्यानरत धीर पुरुषानें वनांत आनंद मानावा, व झाडाखालीं बसून आपणांला सन्तोषित करून ध्यान करावें. (३१)

७१० त्यानंतर रात्र संपल्यावर गांवाच्या टोकांशी असलेल्या निवासस्थानीं यावें गांवांतून आलेल्या आमन्त्रणाचें किंवा भेटीचें (आपल्या मनांत) अभिनंदन करूं नये. (३२)

७११ गावांत येऊन तेथील कुटुंबांशीं मुनीनें सलगी करूं नये. भिक्षा मिळविण्याच्या बाबतींत मौन धरावें व सूचक शब्द बोलूं नयेत. (३३)
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel