पाली भाषेत :-

१०१२ कोसम्बि चापि साकेतं सावत्थिं च पुरुत्तमं।
सेतव्यं कपिलवत्थुं१(१म.-कपिलं.) कुसिनारं च मंदिरं।।३७।।

१०१३ पावं च भोगनगरं वेसालिं मागधं पुरं।
पासाणकं चेतियं च रमणीयं मनोरमं।।३८।।

१०१४ तसितो वुदकं२(२म.-व ओदकं,) सीतं महालाभं३(३ नि.-महासालं.) व वाणिजो। 
छायं धम्माभितत्तो व तुरिता पब्बतमारुहुं४(४सी.-भारुहं, मारहुं, अ. मारुहिं. )।।३९।।

१०१५ भगवा च तम्हि समये भिक्खुसंघपुरक्खतो।
भिक्खूनं धम्मं देसेति सीहो व नदती५(५ म.-नदति.) वने।।४०।।

१०१६ अजितो अद्दस६(६म.-अद्द.) संबुद्धं वीतरंसी७(७म.-जितरसं, सतरंसि, म. पीतरंसिं;) व भानुमं। 
चन्दं यथा पन्नरसे८( ८ सी.-पण्णरसे) पारिपूरिं९(९ म.-परिपूरं.) उपागतं।।४१।।

मराठीत अनुवाद :-


१०१२. कौशांबीला, साकेताला, आणि सर्व नगरांत श्रेष्ठ अशा श्रावस्तीला, सेतव्याला, कपिलवस्तूला, कुसिनारा-मंदिराला, (३७)

१०१३. पावाला, भोगनगराला, वैशालीला, मगधपुराला (राजगृहाला), आणि रमणीय व मनोरम पाषाणक चैत्याला ते आले.(३८)

१०१४ तान्हेलेला जसा पाण्याकडे जातो, वाणी जसा मोठ्या फायद्याकडे जातो, व उन्हानें सन्तप्त झालेला जसा छायेकडे जातो, तसे ते त्वरेनें त्या पर्वतावर चढले.(३९)

१०१५ भिक्षुसंघानें पुरस्कृत असा भगवान् त्या समयीं अरण्यांत गर्जना करणार्‍या सिंहाप्रमाणें भिक्षूंना धर्मोपदेश करीत होता. (४०)

१०१६ (शांतपणे प्रकाशणार्‍या) वीतरश्मि सूर्यासारख्या आणि पौर्णिमेला पूर्णतेला गेलेल्या चन्द्रासारख्या त्या संबुद्धाला अजितानें पाहिलें. (४१)
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel