पाली भाषेत :-

१०१७ अथऽस्स गत्ते दिस्वान १(१-१म.-परिपुण्णं च व्यञ्जनं, परिपूरं वियंजनं. )परिपूरं च व्यञ्जनं१।
एकमन्तं ठितो हट्ठो मनोपञ्हे अपुच्छथ।।४२।।

१०१८ आदिस्स जम्मनं२(२म.-जप्पतं.) ब्रूहि गोत्तं ब्रूहि सलक्खणं।
मन्तेसु पारमिं ब्रूहि कति वाचेति ब्राह्मणो।।४३।।

१०१९ वीसं वस्ससतं आयु सो च गोत्तेन बावरि।
तीणस्स३(३म.-तीणिऽस्स.) लक्खणा गत्ते तिण्णं वेदान पारगू।।४४।।

१०२० लक्खणे इतिहासे च सनिघण्डुसकेटुभे४(४ म.केटभे)
पञ्च सतानि वाचेति सधम्मे५(५म.-सद्धम्मे.) पारमिं गतो।।४५।।

मराठीत अनुवाद :-

१०१७ आणि त्याच्या गात्रांवर परिपूर्ण लक्षणें पाहून तो एका बाजूस उभा राहिला, आणि हर्षित होऊन त्यानें आपल्या मनांतल्या मनांत बुद्धाला प्रश्न विचारले— (४२)

१०१८ प्रथमत: त्याचें (बावरीचें) वय - जन्म केव्हां झाला तें -सांग, आणि मग गोत्र आणि लक्षणें सांग. नंतर वेदाध्ययनांतील पारंगतता, आणि तो किती ब्राह्मणांना शिकवितो तें सांग. (४३)

१०१९ (भगवान्-) त्याचें वय एकशेंवीस वर्षे, गोत्र बावरि, त्याच्या गात्रांवर तीन लक्षणें आहेत, आणि तो तीन वेदांत पारंगत आहे. (४४)

१०२० तो लक्षणज्ञानांत, इतिहासांत, निघंटूंत व कैटुभांतही१ (१. ह्या शब्दावरील सेलसुत्तांत दिलेली टीप पहा. पान १८०) पारंगत आहे. स्वधर्मांत पारंगत असा तो पांचशें विद्यार्थ्यांना वेद शिकवितो. (४५)
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel