पाली भाषेत :-

१०६६ कित्तयिस्सामि ते सन्तिं (धोतका ति भगवा) दिट्ठे धम्मे अनीतिहं
यं१(१ सी.- सं.) विदित्वा सतो चरं तरे लोके विसत्तिकं।।६।।

१०६७ तं २(२ सी.- वाऽहं.)चाहं अभिनन्दामि महेसि सन्तिमुत्तमं।
यं विदित्वा सतो चरं तरे लोके विसत्तिकं।।७।।

१०६८ यं किञ्चि संपजानासि (धोतका ति भगवा)। उद्धं अधो तिरियं ३( ३ सी.-वाऽपि.)चापि मज्झे।
(४म. - एते.)एतं विदित्वा५ (५सी., Fsb-विदित्वान.)संगो ति लोके। भवाभवाय माऽकासि तण्हं ति।।८।।

धोतकमाणवपुच्छा निट्ठिता।

मराठीत अनुवाद :-


१०६६ परंपरागत नसून, आपल्या आयुष्यांत (प्रत्यक्ष फलदायक), अशी - हे धोतका, असें भगवान् म्हणाला — व जिचें ज्ञान मिळवून, स्मृतिमान् होऊन वागणारा या जगांत तृष्णेच्या पार जातो, ती शांति मी तुला सांगतों. (६)

१०६७ हे महर्षें, जिचें ज्ञान मिळवून, स्मृतिमान् होऊन वागणारा तृष्णेच्या पार जातो, त्या उत्तम शांतीचें मी अभिनंदन करतों. (७)

१०६८ जें काहीं वर, खालीं, चौफेर आणि मध्यें — हे धोतक, असें भगवान् म्हणाला - तूं जाणशील, तें या जगांत आसक्तिमय आहे, असें जाणून भवाभवाविषयीं तृष्णा धरूं नकोस.(८)

धोतकमाणवपुच्छा समाप्त

६१
[७. उपसीवमाणवपुच्छा (६)]

पाली भाषेत :-


१०६९ एको अहं सक्क महन्तमोघं (इच्चायस्मा उपसीवो) अनिस्सितो नो विसहामि तारितुं।
आरम्मणं ब्रूहि समन्तचक्खु। यं निस्सितो ओधमिमं तरेय्य१(१ नि.-तरेय्यं.)।।१।।

१०७० आकिञ्चञ्ञं पेक्खमानो सतीमा (उपसीवा ति भगवा)। नत्थी ति निस्साय तरस्सु ओघं।।
कामे पहाय विरतो कथाहि। तण्हक्खयं रत्तमहाभिपस्स२(२ रो. ए.- नत्तमहाभिपस्स, सी. नत्तमहाभि तपस्स, म., नि. (म) - रत्तमहाभिपस्स, [वस्सं ] अ. (म.) - तण्हक्खय रत्तमहं विपस्स.)।।२।।

६१
[७. उपसीवमाणवपुच्छा (६)]

मराठीत अनुवाद :-

१०६९ हे शाक्या, हा महौघ — असें आयुष्मान् उपसीव म्हणाला - मी कशाचाही आश्रय न करतां एकाकी तरून जाऊं शकत नाहीं. हे समन्तचक्षु, ज्याच्या आश्रयानें मी हा ओघ तरूं शकेन, असें आलंबन मला सांग. (१)

१०७० आकिंचन्य पाहणारा आणि स्मृतिमान् होऊन — हे उपसीवा, असें भगवान् म्हणाला — “काहीं नाहीं” या आलंबनाच्या आश्रयानें ओघ तरून जा, कामोपभोगांचा त्याग करून शंकांपासून विरत हो, आणि रात्रंदिवस तृष्णाक्षयाचें (निर्वाणाचें) चिन्तन कर. (२)
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel