पाली भाषेतः-

७१७ अलीनचित्तो च सिया न चापि बहु चिन्तये।
निरामगन्धो असितो ब्रह्मचरियपरायणो।।३९।।

७१८ एकासनस्स सिक्खेथ समणोपासनस्स च।
एकत्तं मोनमक्खातं एको चे १अभिरमिस्सति।।४०।।(१ अ.-अभिरामस्ससि.)

७१९ अथ भासिहि दस दिसा
सुत्वा धीरानं निग्घोसं झायीनं कामचागिन२।(२ रो.-कामचागीनं.)
ततो हिरिं च सद्धं च भिय्यो कुब्बेथ मामको।।४१।।

७२० तं नदीहि विजानाथ सोब्भेसु पदरेसु च।
सणन्ता यन्ति कुस्सोब्भा तुण्ही याति महोदधि।।४२।।

मराठी अनुवादः-

७१७ चित्त जागृत ठेवावें पण फार चिन्तनही करूं नये; निरामगंध, अनाश्रित आणि ब्रह्मचर्यपरायण व्हावें. (३९)

७१८ एकांतवासाची व श्रमण ज्याची उपासना करतात अशा (ध्यानचिंतनाची) शिकवण मनांत बाळगावी. एकाकीपणाला मौन म्हणतात. जर एकाकी राहण्यांत तुला आनंद वाटू लागेल;(४०)

७१९ तर ध्यानरत कामत्यागी धीरांचें भाषण ऐकून तूं दशदिशा प्रकाशित करशील. तरी (त्या स्थितीस पोहोंचलेल्या) माझ्या श्रावकानें ही (पापलज्जा) आणि श्रद्धा वाढवावी.(४१)

७२० तें नदीच्या (उपमेनें) जाणावें. ओढे खांचखळग्यांतून व खिंडींतून मोठा आवाज करीत वाहतात; पण मोठ्या नद्या संथपणें वाहतात.(४२)

पाली भाषेतः-

७२१ यदूनकं तं सणति यं पूरं सन्तमेव तं।
अड्ढकुंभूपमो बालो रहदो पूरो व पण्डितो।।४३।।

७२२ यं समणो बहु भासति उपेतं अत्थसंहितं।
जानं सो धम्मं देसेति जानं सो बहु भासति।।४४।।

७२३ यो च जानं यतत्तो१( सी.-संयतत्तो) जानं न बहु भासति।
स मुनि मोनमरहति स मुनि मोन२मज्झगा ति।।४५।।(२ म.-मुनं.)

नालकसुत्तं निट्ठितं।

मराठीत अनुवाद :-

७२१ जें उथळ तें खळखळतें, पण जें गंभीर तें संथच असतें. मूर्ख अर्ध्या घड्याप्रमाणें (खळखळतो); पण सुज्ञ गंभीर जलहृदाप्रमाणें (शांत असतो).(४३)

७२२ श्रमण (बुद्ध) जें पुष्कळ बोलतो, तें हितयुक्त आणि अर्थयुक्त आहे असें जाणून बोलतो. जाणून तो धर्मोपदेश करतो, व जाणून पुष्कळ बोलतो. (४४)

७२३ जो संयतात्मा जाणत असतां पुष्कळ बोलत नाहीं, तो मुनि मौनार्ह होय; त्या मुनीनें मौन प्राप्त केलें आहे.’(४५)

नालकसुत्त समाप्त
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel