पाली भाषेतः-

६३३ यो च दीघं व रस्सं वा अगुं थूलं सुभासुभं।
लोके अदिन्नं नादियति तमहं ब्रूमि ब्राह्मणं।।४०।।

६३४ आसा यस्स न विज्जन्ति अस्मिं लोके परम्हि च।
निरासयं१(१ म.-निरासायं.) विसयुत्तं तमहं ब्रूमि ब्राह्मणं।।४१।।

६३५ यस्सालया न विज्जन्ति अञ्ञाय अकथंकथी।
अमतोगधं अनुप्पत्तं तमहं ब्रूमि ब्राह्मणं।।४२।।

६३६ यो ध पुञ्ञं च पापं च उभो संगं उपच्चगा।
असोकं विरजं सुद्धं तमहं ब्रूमि ब्राह्मणं।।४३।।

६३७ चन्दं व विमलं सुद्धं विप्पसन्नमनाविलं।
नन्दीभ२(२ म.-नन्दीराग.) वपरिक्खीण तमहं ब्रूमि ब्राह्मणं।।४४।।

मराठी अनुवादः-

६३३. आणि जो या जगांत दीर्घ किंवा हृस्व, अणु किंवा स्थूल, सुन्दर किंवा असुन्दर वस्तु चोरीत नाहीं, त्याला मी ब्राह्मण म्हणतों.(४०)

६३४. ज्याला इह किंवा परलोकाविषयीं आसक्ति नाहीं, जो अनासक्त व विसंयुक्त, त्याला मी ब्राह्मण म्हणतों.(४१)

६३५. ज्याला आलय नाहींत, जो ज्ञान पावून नि:शंक झाला जो अमृताप्रत (निर्वाणाप्रत) पोहोंचून त्यांत अवगाहन करतो, त्याला मी ब्राह्मण म्हणतों.(४२)

६३६. जो इहलोकीं पुण्य आणि पाप या दोघांचाही संग सोडून गेला, जो अशोक, विमल आणि शुद्ध, त्याला मी ब्राह्मण म्हणतों.(४३)

६३७. जो चंद्रासारखा विमल, शुद्ध, प्रसन्न, अनाविल, व ज्याची भवतृष्णा नष्ट झाली, त्याला मी ब्राह्मण म्हणतों.(४४)
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel