पाली भाषेत :-

१६
[४. महामंगलसुत्तं]


एवं मे सुतं। एकं समयं भगवा सावत्थियं विहरति जेतवने अनाथपिण्डिस्स आरामे। अथ खो अञ्ञतरा देवता अभिक्कन्ताय रत्तिया अभिक्कन्तवण्णा केवलकप्पं जेवतनं ओभासेत्वा येन भगवा तेनुपसेकमि, उपसंकमित्वा भगवन्तं अभिवादेत्वा एकमन्तं अट्ठासि। एकमन्तं ठिता खो सा देवता भगवन्तं गाथाय अज्झभासि—

२५८ बहू देवा मनुस्सा त मंगलानि अचिन्तयुं।
आकंखमाना सोत्थानं ब्रूहि मंगलमुत्तमं।।१।।

२५९ असेवना च बालानं पण्डितानं च सेवना।
पूजा च पूजनीयानं एतं मंगलमुत्तमं।।२।।

मराठीत अनुवाद :-

१६
[४. महामंगलसुत्त]


असें मी एकलें आहे. एके समयीं भगवान् श्रावस्ती येथें जेतवनांत अनाथपिंडिकाच्या आरामांत राहत होता. तेव्हां रात्र संपत आली असतां एक अत्यंत सुन्दर देवता सर्व जेतवन प्रकाशित करून भगवन्तापाशीं आली. येऊन भगवन्ताला नमस्कार करून एका बाजूला उभी राहिली. एका बाजूस उभी राहून ती देवता भगवन्ताला गाथेनें बोलली:--

२५८. अनेक देवांनीं आणि मनुष्यांनीं ‘आपणांस सुख मिळावें’ या उद्देशानें मंगलाची कल्पना अमलांत आणली आहे. त्यांत उत्तम मंगल कोणतें तें सांग. (१)

२५९ (भगवान्-) मूर्खांच्या सहवासापासून दूर राहणें, सुज्ञांची संगति धरणें व पूज्य जनांची पूजा करणें, हें उत्तम मंगल होय. (२)

पाली भाषेत :-

२६० पतिरूपदेसवासो च पुब्बे च कतपुञ्ञता।
अत्तसम्मापणिधि च एतं मंगलमुत्तमं।।३।।

२६१ बाहुसच्चं च सिप्पं च विनयो च सुसिक्खितो।
सुभासिता च या वाचा एतं मंगलमुत्तमं।।४।।

२६२ मातापितु-उपट्ठानं पुत्तदारस्स संगहो।
अनाकुला च कम्मन्ता एतं मंगलमुत्तमं।।५।।

२६३ दानं च धम्मचरिया च ञातकानं च संगहो।
अनवज्जानि कम्मानि एतं मंगलमुत्तमं।।६।।

२६४ आरति विरति पापा मज्जपाना च संयमो|
अप्पमादो च धम्मेसु एतं मंगलमुत्तमं ||७||

२६५ गारवो च निवातो च संतुट्ठि१(१ रो.-संतुट्ठि.) च कतञ्ञुता|
कालेन धम्मसवणं एतं मंगलमुत्तमं ||८||

मराठीत अनुवाद :-

२६०. अनुकूल प्रदेशांत वास्तव्य, पदरीं पुण्याचा सांठा आणि सन्मार्गांत मनाला गुंतवणें,
हें उत्तम मंगल होय. (३)

२६१. विद्यासंपादन, कलासंपादन, सद्वर्तनाची संवय व चांगलें भाषण, हें उत्तम मंगल होय. (४)

२६२. आईबापांची सेवा, बायको-मुलांचा संभाळ आणि व्यवस्थितपणें केलेलीं कर्में, हें उत्तम मंगल होय. (५)

२६३. दान-धर्म,  धार्मिक आचरण, नातलगांना मदत व प्रशस्त कर्में, हें उत्तम मंगल होय. (६)

२६४. पापापासून पूर्ण निवृत्ति, मद्यपानापासून संयम, आणि धर्मिक कृत्यांत दक्षता, हें उत्तम मंगल होय. (७)

२६५. आदर, नम्रता, सन्तुष्टी, कृतज्ञता आणि वेळोंवेळीं सद्धर्म श्रवण करणें, हें उत्तम मंगल होय (८)
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel