पाली भाषेत :-

९६६ आतंकफस्सेन खुदाय फुट्ठो। सीतं अच्चुण्ह१ अधिवासयेय्य। (१ नि.-अतुण्हं.)
सो तेहि फुट्ठो बहुधा अनोको। विरियं परक्कम्म२ दळ्हं करेय्य।।१२।। (२ नि. परक्कमं.)

९६७ थेय्यं न करेय्य३ न मुसा भणेय्य। मेत्ताय फस्से तसथावरानि। (३ नि.-कारे.)
यदाविलत्तं मनसो विजञ्ञा। कण्हस्स पक्खो ति विनोदयेय्य।।१३।।

९६८ कोधातिमानस्स वसं न गच्छे। मूलंऽपि तेसं पलिखञ्ञ तिट्ठे।
अथप्पियं वा पन अप्पियं वा। अद्धा भवन्तो अभिसंभवेय्य।।१४।।

९६९ पञ्ञं पुरक्खत्वा४ कल्याणपीति। विक्खंभये तानि परिस्सयानि। (४ नि.-पुरक्खित्वा.)
अरतिं सहेथ सयनह्मि पन्ते। चतुरो सहेय्य परिदेवधम्मे।।१५।।

मराठीत अनुवाद :-

९६६ रोगानें आणि भुकेनें त्रस्त झाला असतां (तो उपद्रव) व शीत आणि अत्युष्ण हीं त्यानें सहन करावींत. त्या विघ्नांनीं अनेक रीतींनीं त्रास दिला तरी, गृहरहित राहून, त्यानें आपला उत्साह पराक्रम दृढ करावा.(१२)

९६७. त्यानें चोरी करूं नये, खोटें बोलू नये, स्थिर आणि चर प्राण्यांवर मैत्रीची भावना करावी, आणि मनाचा कलुषितपणा हा माराचा (कृष्णाचा) पक्षपाती असें जाणून त्याचा नाश करावा. (१३)

९६८ त्यानें क्रोधाला आणि अतिमानाला वश होऊं नये; त्यांचीं मुळें देखील खणून काढावींत; आणि मग त्या वृद्धिंगत होऊं पाहणार्‍याला प्रिय अथवा अप्रिय वस्तूवर खात्रीनें जय मिळवितां येईल. (१४)

९६९ कल्याणप्रिय मनुष्यानें प्रज्ञेचा पुरस्कार करून तीं विघ्नें सहन करावींत; एकान्तवासस्थळीं असंतोष वाटला असतां तोही सहन करावा, आणि चार शोकदायक गोष्टी सहन कराव्यात - (१५)

पाली भाषेत :-

९७० किंसुअसिस्सामि१ २कुवं वा असिस्सं। दुक्खं वत सेत्थ३ कुवज्ज सेस्सं४। (१ नि.-असिस्सं.) (२ नि.- कुथ वा.) (३-४ नि.- वेत्थ क्वज्ज सेय्यं.)
एते वितक्के परिदेवनेय्ये। विनयेथ सेखो अनिकेतसारी५।।१६।। (५ नि.-अनिकेतचारी.)

९७१ अन्नं च लद्धा वसनं च काले। मत्तं स६ जञ्ञा इध तोसनत्थं। (६ नि. - सो.)
सो तेसु गुत्तो यतचारि७ गामे। ८रुसितोऽपि वाचं फरुसं न वज्जा।।१७।।(७ नि.- यतचारी.)
(८ नि.- दूसितोऽपि.)

९७२ ओक्खित्तचक्खु न च पादलोलो। झानानुयुत्तो बहुजागरस्स।
उपेक्खमारब्भ समाहितत्तो। तक्कासयं कुक्कुच्चियूपछिन्दे९।।१८।। (९ नि. - कुक्कुच्चं चूपछिन्दे.)

मराठीत अनुवाद :-

९७० (त्या ह्या-) ‘मी आज काय खाईन; अथवा कोठें जेवेन; रात्रीं निजण्याचे बाबतींत मला फार त्रास झाला; (तेव्हां) आज मी कोठें निजावें?’ अनागारिक भावानें राहणार्‍या शैक्ष्यानें (सेखानें) या (चार) दु:खकारक वितर्कांचा नाश करावा. (१६)

९७१ योग्य वेळीं अन्न आणि वस्त्र मिळालें असतां, आपला संतोष रहावा म्हणून त्या पदार्थांच्या सेवनांत त्यानें प्रमाण जाणावें. त्या पदार्थांपासून मनाचें रक्षण करणार्‍या व गांवांत संयमानें वागणार्‍या त्या भीक्षूनें (इतरांनीं राग येण्याजोगें कृत्य केलें असतांही) रुष्ट होऊन कठोर वचन बोलूं नये. (१७)

९७२ त्यानें आपली दृष्टि पायांजवळ ठेवावी; पायांनीं चंचळ होऊं नये; ध्यानरत व्हावें; (व) रात्रीचा बराच काळ जागृतावस्थेंत घालवावा; उपेक्षेचा अवलंब करून चित्ताची एकाग्रता मिळवावी, व तर्क आणि कौकृत्य१ (१. ९२५ व्या गाथेवरील टीप पहा.) यांचा त्याग करावा. (१८)
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel