पाली भाषेतः-

५४८ परिपुण्णकायो सुरुचि सुजातो चारुदस्सनो।
सुवण्णवण्णोऽसि भगवा सुसुक्कदाठोऽसि विरियवा।।१।।

५४९ नरस्स हि सुजातस्स ये भवन्ति वियंजना।
सब्बे ते तव कायस्मिं महापुरिसलक्खणा।।२।।

५५० पसन्ननेत्तो सुमुखो ब्रह्मा उजु पतापवा।
मज्झे समणसंघस्स आदिच्चो व विरोचसि।।३।।

५५१ कल्याणदस्सनो भिक्खु कंचनसन्निभत्तचो।
किं ते समणभावेन एवं उत्तमवण्णिनो।।४।।

मराठी अनुवादः-

५४८ हे भगवन्, तूं परिपूर्णकाय, सुरुचि, सुजात, चारुदर्शन, सुवर्णवर्ण, सुशुक्कदन्त व वीर्यवान् आहेस!(१)

५४९ सुजात मनुष्याचीं जीं लक्षणें असतात, तीं सर्व महापुरुषलक्षणें तुझ्या देहावर आहेत!(२)

५५० प्रसन्ननेत्र, सुमुख, भव्य, सरळ आणि प्रतापवान् असा तूं श्रमणसंघाच्या मध्यें सूर्यासारखा प्रकाशतोस! (३)

५५१ तूं कल्याणदर्शनकारक व सोन्यासारख्या कांतीच्या भिक्षु आहेस. अशा उत्तम कान्तिसंपन्नाला तुला हें श्रामण्य कशास हवें?(४)

पाली भाषेतः-

५५२ राजा अरहसि भवितुं चक्कवत्ती रथेसभो।
चातुरन्तो विजितावी जम्बुसण्डस्स१ इस्सरो।।५।।(१ म.-जंबुमण्डस्स.)

५५३ खत्तिया भोजराजानो अनुयुत्ता भवन्ति ते।
राजाभिराजा मनुजिन्दो रज्जं कारेहि गोतम।।६।।

५५४ राजाऽहमस्मि सेला (ति भगवा) धम्मराजा अनुत्तरो।
धम्मेन चक्कं वत्तेमि चक्कं अप्पतिवत्तियं।।७।।

५५५ संबुद्धो पटिजानासि (इति सेलो ब्राह्मणो) धम्मराजा अनुत्तरो।
धम्मेन चक्कं वत्तेमि इति भाससि गोतम।।८।।

५५६ को नु सेनापति भोतो सावको सत्थुदन्वयो२।(२ म.-सत्थुअन्वयो, थे. गा.- सत्थुरन्वयो.)
को ते इमं अनुवत्तेति धम्मचक्कं पवत्तितं।।९।।(३ म.-पवत्तियं.)

मराठी अनुवादः-

५५२. तूं रथर्षभ, चारही दिशांवर सत्ता चालविणारा, विजयी, जम्बुद्वीपाचा ईश्वर असा चक्रवर्ती राजा होण्यास योग्य आहेस. (५)

५५३. हे गोतमा, क्षत्रिय आणि मांडलिक राजे (भोजराजे) तुझे अंकित होवोत, राजाधिराज मनुजेन्द्र होऊन तूं राज्य कर! (६)

५५४. हे सेला, मी राजा आहें—असें भगवान् म्हणाला-मी अनुत्तर धर्मराजा आहें. पूर्वी कोणीही न चालूं केलेलें असें चक्र मी धर्मानुसार चालू करीत आहे.(७)

५५५. तूं आपणाला संबुद्ध म्हणवतोस—असें सेल ब्राह्मण म्हणाला—तूं आपणांला अनुत्तर धर्मराजा म्हणवतोस, व हे गोतमा, आपण धर्मानुसार चक्र चालूं करतों, असें म्हणतोस,(८)

५५६. तर मग शास्त्याच्या मागोमाग जाणारा सेनापति म्हणतां येईल असा तुझा श्रावक कोण? जें तूं धर्मचक्र चालूं केलेंस, तें तुझ्या मागोमाग कोण चालूं ठेवील? (९)
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel