पाली भाषेत :- 

[८. मेत्तसुत्त]


१४३ करणीयमत्थकुसलेन यं तं सन्तं पदं अभिसमेच्च।
सक्को उजू च सूजू च सुवचो चऽस्स मुदु अनतिमानी।।१।।

१४४ सन्तुस्सको च सुभरो च अप्पकिच्चो च सल्लहुकवुत्ति।
सन्तिन्द्रियो च निपको च अप्पगब्भो कुलेसु अननुगिद्धो।।२।।

१४५ न च खुद्दं समाचरे किञ्चि येन विञ्ञू परे उपवदेय्युं।
सुखिनो वा खेमिनो होन्तु सब्बे सत्ता भवन्तु सुखितऽत्ता।।३।।

१४६ ये केचि पाणभूतत्थि तसा वा थावरा वा अनवसेसा।
दीघा वा ये महन्ता वा मज्झिमा रस्सकाऽणुकथूला।।४।।

१४७ दिट्ठा वा येव१ (१ म.-ये च अदिट्ठा.) अद्दिट्ठा ये च दूरे वसन्ति अविदूरे।
भूता वा संभवेसी वा सब्बे सत्ता भवन्तु सुखितऽत्ता।।५।।

१४८ न परो परं निकुब्बेथ नातिमञ्ञेथ कत्थचि नं कञ्चि।
ब्यारोसना पटिघसञ्ञा नाञ्ञमञ्ञस्स दुक्खमिच्छेय्य।।६।।


मराठीत अनुवाद :-
[८. मेत्तसुत्त]


१४३. शांत पदाचें ज्ञान मिळवून तें पद प्राप्त करूं पाहणार्‍या आत्महितदक्ष माणसाचें कर्तव्य हें कीं, (त्यानें आपलें कर्तव्य पार पाडण्यास) समर्थ, सरळांत सरळ, गोड बोलणारा, मृदु आणि निगर्वीं व्हावे. (१)

१४४. आणि (त्यानें) सन्तुष्ट, पोसण्यास सुलभ, उलाढाली न करणारा, साधेपणें वागणारा, शान्तेन्द्रिय, हुशार, अधृष्ट, व कुटुंबाविषयीं जास्त लोभ न बाळगणारा व्हावें. (२)

१४५. जेणेंकरून सुज्ञ लोक इतरांस दोष देतात, असें क्षुद्र आचरण करूं नये. सर्व प्राणी सुखी, क्षेमी आणि आनंदित होवोत (अशी भावना करावी). (३)

१४६. जे कोणी चर किंवा स्थावर, लांब किंवा मोठे, मध्यम, ह्रस्व, अणुक आणि स्थूल ते सर्व प्राणी—(४)

१४७. दिसणारे अथवा न दिसणारे आणि जे दूर व जवळ राहतात, उत्पन्न झालेले किंवा उत्पन्न होतील ते-सर्व प्राणी आनंदित होवोत. (५)

१४८. (त्यांपैकी) एक दुसर्‍याला न ठकवो; कोठेंही एक दुसर्‍याची अवज्ञा न करो, रागावण्यानें व द्वेषबुद्धीनें एक दुसर्‍याला दु:ख देण्याची इच्छा न धरो. (६)
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel