पाली भाषेत :-

३६८ सारुप्पमत्तनो विदित्वा। न च भिक्खु हिंसेय्य कंचि१( १ म.-किंचि.) लोके।
यथातथियं विदित्वा धम्मं। सम्मा सो लोके परिब्बजेय्य।।१०।।

३६९ यस्सानुसया न सन्ति केचि। मूला अकुसला समूहतासे।
सो निरासयो अनासयानो२(२ रो.-अनाससानो, म.- निरासो अनासिसानो.)। सम्मा सो लोके परिब्बजेय्य।।११।।

३७० आसवखीणो पहीनमानो। सब्बं रागपथं उपातिवत्तो।
दन्तो परिनिब्बुतो ठितऽत्तो। सम्मा सो लोके परिब्बजेय्य।।१२।।

३७१ सद्धो सुतवा नियामदस्सी। वग्गगतेसु न वग्गसारि धीरो।
लोभं दोसं विनेय्य पटिघं। सम्मा सो लोके परिब्बजेय्य।।१३।।

मराठीत अनुवाद :-

३६८. आपलें उचित (कर्तव्य) काय आहे हें जाणून कोणाचीही या जगांत हिंसा करणार नाहीं असा जो भिक्षु, तो यथातथ्य धर्म जाणून या जगांत सम्यक्-परिव्राजक होईल. (१०)

३६९. ज्याच्या अन्त:करणांत पापानुशय राहिले नाहींत, ज्यानें अकुशलांचीं मुळें खणून काढलीं, तो निस्तृष्ण आणि नि:स्पृह असा होऊन या सम्यक्-परिव्राजक होईल. (११)

३७०. ज्याचे आश्रव क्षीण झाले व अहंकार नष्ट झाला, जो कामसुखाचा सर्व मार्ग सोडून पलीकडे गेला, जो दान्त, परिनिर्वृत व स्थितात्मा, तो या जगांत सम्यक्-परिव्राजक होईल. (१२)

३७१. जो श्रद्धावान्, श्रुतसंपन्न, सम्यग्मार्गदर्शीं, पक्षपाती लोकांत पक्षपातानें वागत नाहीं, तो धीर पुरुष लोभ, द्वेष आणि क्रोध सोडून या जगांत सम्यक्-परिव्राजक होईल. (१३)

पाली भाषेत :-
३७२ संसुद्धजिनो विवत्तच्छद्दो १( १ म.-विवटच्छदो.)। धम्मेसु वसी पारगू अनेजो।
संखारनिरोधञाणकुसलो। सम्मा सो लोके परिब्बजेय्य।।१४।।

३७३ अतीतेसु अनागतेसु चापि। कप्पातीतो अतिच्च सुद्धिपञ्ञो।
सब्बायतनेहि विप्पमुत्तो। सम्मा सो लोके परिब्बजेय्य।।१५।।

३७४ अञ्ञाय पदं समेच्च धम्मं। विवटं दिस्वान पहानमासवानं।
सब्बूपधीनं परिक्ख२यानो(२ रो.-परिक्खया.)। सम्मा सो लोके परिब्बजेय्य।।१६।।

३७५ अद्धा हि भगवा तथेव एतं। यो सो एवं विहारि दन्तो भिक्खु।
सब्बसंयोजनिये च वीतिवत्तो। सम्मा सो लोके परिब्बजेय्या ति।।१७।।

सम्मापरिब्बाजनियसुत्तं निट्ठितं

मराठीत अनुवाद :-

३७२. शुद्ध मार्गानें क्लेशांना जिंकणारा, (लोभ, द्वेष आणि मोह यांच्या) आवरणानें विरहित, धर्मांत प्रवीण, संसारपाग, अप्रकंप्य व संस्कारनिरोधाच्या ज्ञानांत कुशल असा जो, तो या जगांत सम्यक्-परिव्राजक होईल. (१४)

३७३. अतीत आणि अनागत कालांतीलही अहंकाराच्या कल्पनांच्या पार गेलेला, अत्यंत शुद्ध प्रज्ञा असलेला, व सर्व आयतनांपासून मुक्त असा जो, तो या जगांत सम्यक्-परिव्राजक होईल. (१५)

३७४. आर्यसत्यें१ (१ टीकाकाराच्या मताप्रमाणें हा अर्थ आहे.) जाणून व धर्माचा बोध करून घेऊन व आश्रवांचा नाश स्पष्टपणें पाहून जो सर्व उपाधींचा क्षय करतो, तो या जगांत सम्यक्-परिव्राजक होईल. (१६)

३७५. हे भगवन्, हें तुझें म्हणणें बरोबर आहे. जो भिक्षु याप्रमाणें दान्त व सर्व संयाजनांपासून मुक्त होऊन राहतो, तो या जगांत सम्यक्-परिव्राजक होईल. (१७)

सम्मापरिब्बाजनियसुत्त समाप्त
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel