यन्निमित्तः स वै शापो यादृशो द्विजसत्तम ।
कथमेकात्मनां भेद एतत्सर्वं वदस्व मे ॥९॥
शापासि मूळ मुख्य संतापु । कैसेनि ब्राह्मणां आला कोपु ।
कोणेपरीचा दिधला शापु । संक्षेपरुपु सांगावा ॥८१॥
यादव समस्त सखे बंधु । यांसि प्रतिपाळी स्वयें गोविंदु ।
एकात्मता स्वगोत्रसंबंधु । त्यांमाजीं युद्धभेदु घडे कैसा ॥८२॥
"आत्मा वै पुत्रनामासि" । हे श्रुति प्रमाण सर्वांसी ।
तेथें शाप बाधी कृष्णात्मजांसी । केवीं आलें यासी सत्यत्व ॥८३॥
कृष्णसंकल्प कुळनाशन । तोचि ब्रह्मशापासी कारण ।
यालागीं बाधक जाण । होय संपूर्ण यादवां ॥८४॥
सृष्टि स्त्रजी पाळी संहारी । हें कृष्ण संकल्पमात्रें करी ।
तो यदुकुळनिधन निर्धारी । त्याची अवतारथोरी शुक सांगे ॥८५॥
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.