स्वधर्मस्थो यजन्यज्ञैरनाशीः काम उद्धव ।
न याति स्वर्गनरकौ, यद्यन्यन्न समाचरेत् ॥१०॥
गृहस्थाश्रमीं स्वधर्मस्थिती । जरी विचरेना ’अन्यगती’ ।
तरी येथेंचि लाहे विरक्ती सुनिश्चितीं उद्धवा ॥११०॥
अन्यगतींचें विचरण । तें तूं म्हणशील कोण ।
ऐक त्याचेंही लक्षण समूळ खूण सांगेन ॥११॥
परद्रव्य-परदारा-रती । परापवादाची वदंती ।
ही नांव गा ’नारकी गती’ । जाण निश्चितीं उद्धवां ॥१२॥
दिविभोगाचेनि श्रवणें । ज्याच्या मनाचें बैसे धरणें ।
कर्में तदनुकूल करणें । तैं स्वर्गा भोगणें अलोट ॥१३॥
या जाण दोन्ही ’अन्यगती’ । यांतूनि काढूनियां वृत्ती ।
यज्ञादिकीं मज यजिती । तैं नैराश्यस्थिती नित्यनैमित्यें ॥१४॥
तैं न पडे स्वर्गीचें पेणें । न घडे नरकासी जाणें ।
येचि लोकीं विरक्त होणें । तेंचि बोलणें हरि बोले ॥१५॥
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.