एते वै भगवद्रूपं विश्वं सदसदात्मकम् ।
आत्मनोऽव्यतिरेकेण पश्यन्तो व्यचरन्महीम् ॥२२॥
ते वेगळे दिसती नवांक । परी भगवद्रूपें अवघे एक ।
संतासंत जन अनेक । आपणांसगट देख एकत्वें पाहती ॥८५॥
त्यांसी तंव असंतता । उरली नाहीं सर्वथा ।
संत म्हणावया पुरता । भेदु न ये हाता चिन्मयत्वें ॥८६॥
जग परिपूर्ण भगवंतें । आपण वेगळा नुरे तेथें ।
तंव भगवद्रूप समस्तें । भूतें महाभूतें स्वयें देखे ॥८७॥
हेंहीं देखतें देखणें । तेंही स्वयें आपण होणें ।
होणें न होणें येणें जाणें । हीं गिळूनि लक्षणें विचरती मही ॥८८॥
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.