निवृत्ते भारते युद्धे सुहृन्निधनविह्वलः ।

श्रुत्वा धर्मान् बहून्पश्चान्मोक्षधर्मानपृच्छत ॥१२॥

मी संधि करितां श्रीकृष्ण । तें न मानीच दुर्योधन ।

व्यासें वर्जितां आपण । तरी दृप्तपण युद्धासी ॥५६॥

एवं दैवबळें कुरुक्षेत्रीं । कौरवपांडवां झुंजारीं ।

सापत्‍न दुर्योधनादि वैरी । सपरिवारीं मारिले ॥५७॥

युद्ध निवर्तल्यापाठीं । धर्म बैसल्या राज्यपटीं ।

तेणें अभिमान घेतला पोटीं । महादोषी सृष्टीं मी एक ॥५८॥

मी राज्यीं बैसवितां आपण । म्हणें म्यां मारिला गुरु ब्राह्मण ।

म्यां मारिला कर्ण दुःशासन । राजा दुर्योधन म्यां मारिला ॥५९॥

उत्पत्तिस्थितिप्रलयकर्ता । येथ ईश्वरु जाण तत्त्वतां ।

तें सांडोनियां सर्वथा । `अहं कर्ता' म्हणे धर्म ॥१६०॥

देहाभिमानाचे खटाटोपीं । थोर हो‍ऊनियां अनुतापी ।

गोत्रहंता मी महापापी । ऐसें आरोपी निजमाथां ॥६१॥

त्यासी द्यावया समाधान । समयो भीष्माचें निर्याण ।

तेथें म्यां नेउनियां जाण । धर्में केले प्रश्न ते ऐका ॥६२॥

राजधर्म दानधर्म । पुशिला तेणें आपद्धर्म ।

मुख्यत्वें पुशिला `मोक्षधर्म' । उत्तमोत्तम परियेसीं ॥६३॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel