प्रकृतिर्गुणसाम्यं वै, प्रकृतेर्नात्मनो गुणाः ।

सत्त्वं रजस्तम इति स्थित्युत्पत्त्यन्तहेतवः ॥१२॥

उत्पत्तिस्थितिनिर्दळण । हें त्रिगुणांचें कार्य पूर्ण ।

’गुणसाम्य’ ते प्रकृति जाण । आत्मा ’निर्गुण’ गुणातीत ॥३६॥

म्हणशी परमात्मा गुणातीत । परी जीवात्मा गुणग्रस्त ।

हेही गा मिथ्या मात । ऐक वृत्तांत सांगेन ॥३७॥

चंद्र निश्चळ निजस्वभावें । तो चाले त्या अभ्रासवें ।

दिसे जेवीं सवेग धांवे । तेवीं गुणस्वभावें जीवात्मा ॥३८॥

घटामाजीं उदक भरितां । घटाकाश भिजेना सर्वथा ।

तेवीं जीवात्मा गुणीं वर्ततां । अलिप्तता गुणकर्मी ॥३९॥;

जीव अहंकर्तेपणीं विख्यात । तो केवीं म्हणावा कर्मातीत ।

येचि अर्थी कृष्णनाथ । विशदार्थ सांगत ॥१४०॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel