ब्रह्मंस्तथापि पृच्छामो धर्मान्भागवतांस्तव ।

यान् श्रुत्वा श्रद्धया मर्त्यो मुच्यते विश्वतो भयात् ॥७॥

आदरें म्हणे देवऋषी । आजि सकळ पुण्यें आलीं फळासी ।

मायबाप तूं घरा आलासी । निजसुखासी दायक ॥७९॥

कृपा केली मागील शिष्यां । तेचि कृपेचा घालीं ठसा ।

मज तुझा पूर्ण भरवंसा । सोडवीं भवपाशापासूनि ॥८०॥

तुझेनि दर्शनें कृतकृत्यता । जर्‍ही मज जालि तत्त्वतां ।

तर्‍ही भागवतधर्मकथा । कृपेनें तत्त्वतां सांगावी ॥८१॥

ऐसे सांगावे भागवतधर्म । जेणें निरसे कर्माकर्म ।

श्रद्धेनें ऐकतां परम । जन्ममरण हारपे ॥८२॥

भवभय अतिदारुण । त्या भयाचें माया निजकारण ।

तिचें समूळ होय निर्दळण । ऐसे धर्म कृपेनें सांगावे ॥८३॥

मज नाहीं अधिकार पूर्ण । ऐसें विचाराल लक्षण ।

तेविषयींची हे विनवण । सावधान अवधारीं ॥८४॥;

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel