गृहार्थी सदृशीं भार्यां उद्वहेदजुगुप्सिताम् ।

यवीयसीं तु वयसा यां सवर्णामनुक्रमात् ॥३९॥

करोनियां समावर्तन । व्रतबंधाचें विसर्जन ।

गुरुआज्ञा घेऊनि जाण । पाणिग्रहण करावें ॥९३॥

भार्या पर्णावी सवर्ण । इतर वर्जिले तिन्ही वर्ण ।

स्ववेद-स्वशाखेचे वर्ण । सगोत्रपण चुकवूनि ॥९४॥

जे उभय कुळीं विशुद्ध । जे दशलक्षणीं अनिंद्य ।

देतां मातापित्यांसी आल्हाद । तो श्लाघ्य संबंध पर्णावा ॥९५॥

जिची जन्मोत्तरी पाहतां । स्वयें वरापरीस अधिकता ।

कां समान वयें समता । या दोनी सर्वथा त्यागाव्या ॥९६॥

जन्मपत्र पाहतां दिठीं । वरुषें सातें पांचें धाकुटी ।

ते पर्णावी स्वधर्मदृष्टीं । भार्या गोमटी ती नांव ॥९७॥

नोवरी पाणिग्रहणयुक्त । आठांपासूनि दशवर्षांत ।

अधिक ते वृषली निश्चित । शास्त्रार्थप्रयोगें ॥९८॥

गर्भाष्टमाहूनि खालती । जिची वयसा असे निश्चितीं ।

तो नोवरी वराधिकारीं अप्राप्ती । ऐसें शास्त्रार्थीं बोलिलें ॥९९॥

ऐशा लक्षणांचा नाहीं बाधू । तैशी पर्णावी शुद्ध वधू ।

मग आश्रमधर्म अतिशुद्धू । शास्त्राविरुद्धु तो ऐक ॥४००॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel