ध्यायन्नभ्यर्च्य दारुणि, हृविषाभिघृतानि च ।

प्रास्याज्यभागावाधारौ,दत्वा चाज्यप्लुतं हविः ॥४०॥

जुहुयान्मूलमन्त्रेण, षोडशर्चाऽवदानतः ।

धर्मादिभ्यो यथान्यायं,मन्त्रैः स्विष्टकृतं बुधः ॥४१॥

ऐसें साङग माझें ध्यान । अग्नीमाजीं भावूनि जाण ।

करुनि आवाहन पूजन । विध्युक्त हवन मांडावें ॥१५॥

अग्नि विधियुक्त आव्हानूनी । समिधा होमघृतें अभिघारुनी ।

आज्यभाग दों अवदानीं । प्रथमहवनीं होमावा ॥१६॥

तेथ तिलाज्य हविर्द्रव्य पूर्ण । घृतप्लुत अवदान ।

आगमोक्त होमविधान । स्वयें श्रीकृष्ण सांगत ॥१७॥

लक्षूनि मुखबोध देवाचा । मूलमंत्रें होम साधकांचा ।

कां पुरुषसूक्त सोळा ऋचा । हा होमाचा विधिमार्ग ॥१८॥

धर्मादिक पीठार्चन । इतर देवता आवरण ।

त्यांसीही एकएक अवदान । नाममंत्रें जाण होमावें ॥१९॥

मग स्विष्टकृताचें अवदान । साधकें द्यावें सविधान ।

ऐसें हें माझें निजभजन । भक्त सज्ञान जाणती ॥२०॥

होमादि मूर्तिभजनविधी । येणें तत्काळ साधकां सिद्धी ।

भक्त पावती निजपदीं । जाण त्रिशुद्धी उद्धवा ॥२१॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel