तस्मिन्नहं समभवमण्डें सलिलसंस्थितौ ।
मम नाभ्यामभूत्पद्यं विश्वाख्यं तत्र चात्मभूः ॥१०॥
ऐसें ब्रह्मांड जें विद्यमान । त्यामाजीं मी नारायण ।
लीलाविग्रही झालों जाण । आपण्या आपण विश्वात्मा ॥४३॥
त्या माझे नाभीसी नाभिपद्म । विकासलें विश्वधाम ।
त्याहीमाजीं उत्तमोत्तम । आत्मभू नाम जन्मला ब्रह्मा ॥४४॥
नाहीं योनिद्वारा उदरगर्भू । मज आत्म्यापासूनि स्वयंभू ।
उपजला यालागीं आत्मभू । नामाचा शोभू ब्रह्मयासी ॥४५॥
ब्रह्मांड तो विराटदेहो । त्याचा मुख्य भाग विग्रहो ।
माझे नाभिकमळीं पहा हो । ब्रह्मदेवो जन्मला ॥४६॥
करावया लोकसर्जन । पद्मनाभाचे नाभीसी जाण ।
स्वयें जन्मला चतुरानन । रजोगुणप्राधान्यें ॥४७॥;
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.