तयोरेकतरो ह्यर्थः प्रकृतिः सोभयात्मिका ।

ज्ञानं त्वन्यतमो भावः पुरुषः सोऽभिधीयते ॥४॥

त्या दोहीं भागांमाझारीं । प्रकृतिभाग तो विकारी ।

पुरुषभाग तो अविकारी । स्वयें श्रीहरी सांगत ॥९६॥

तेथ आपण आपुली कांता । आपुले कांतेचा आपण भर्ता ।

एकपणीं दावूनि द्वैता । भिन्नविभागता शिवशक्ती ॥९७॥

जेवीं आपुलें एक अंग । तेथ बोलती वाम सव्य भाग ।

तेवीं प्रकृतिपुरुषविभाग । जाणावे साङग मायिक ॥९८॥

अर्धनारीनटेश्वरीं । जो पुरुष तोचि नारी ।

प्रक्रुतिपुरुषीं तैशी परी । एक शरीरीं एकात्मता ॥९९॥

जैं पुरुषविभाग लपवी । तैं स्वेच्छा प्रकृति नाचवी ।

प्रकृतिभाग जैं लपवी । तैं पुरुषाची पदवी प्रकट दिसे ॥१००॥

मधील पडदा जैं तोडिती । तैं पुरुष ना प्रकृती ।

तेव्हां प्रकटे निजात्मस्थिती । स्त्रीपुरुषव्यक्ती समूळ मिथ्या ॥१॥

ऐशी मिथ्या मायिक प्रकृती । तीपासाव गुणोत्पत्ती ।

गुणास्तव संसारस्थिती । स्वयें श्रीपती सांगत ॥२॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel